‘अष्टपैलू’ हार्दिक पांडयाचा ‘खेळ’ पाहून ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉला आठवला ‘तो’ गेमचेंजर, मॅचविनर खेळाडू

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवला. या सामन्यात सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शानदार शतक झळकावलं. तर हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर येऊन जोरदार फटकेबाजी केली. या सामन्यात त्याने २७ चेंडूत ४८ धावा करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली.

या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ याने या मॅचनंतर हार्दिक पांड्याचं कौतुक केलं आहे. त्याने पांड्याची तुलना एका महान अष्टपैलू खेळाडूबरोबर करून त्यासह कौतुक केलं. त्याने पांड्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसनर बरोबर केली आहे. त्याचे कौतुक करताना तो म्हणाला कि,विरोधी टीमकडे हार्दिक पांड्यासाठी कोणतीही रणनिती नाही.

हार्दिकची ती खेळी विरोधी टीमना घाबरवेल. हार्दिक पांड्या १९९९ सालचा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या लान्स क्लुसनरसारखा आहे. हार्दिक पांड्याकडे बॅटिंगची अशी कला आहे, ज्याचं उत्तर विरोधी कर्णधारांकडे नाही,’ असं स्टीव्ह वॉ म्हणाला. आयसीसी साठी लिहिलेल्या एका स्तंभामध्ये त्याने पांड्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याने या लेखात महेंद्रसिंग धोनीचे देखील कौतुक केले आहे.

‘धोनी हा चतूर असून त्याच्यामध्ये संतुलन आहे. खूप कमीवेळा धोनी चुका करतो. धोनीच्या यशामुळे भारतीय संघाला ३५० रनचा पल्ला गाठता आला,’ त्याचबरोबर लान्स क्लुसनर याने १९९९ च्या वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणले होते. सेमीफायनलमध्ये तर जवळपास त्याने एकहाती दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता.

मात्र तो सामना टाय झाल्याने त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला.दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरोधात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ उद्या न्यूझीलंडबरोबर आपला या स्पर्धेतील तिसरा सामना खेळणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

You might also like