ICC World Cup 2019 : इंग्लंडचा पराभव बांग्लादेशच्या पथ्यावर, सेमीफायनलमध्ये स्थान नक्की ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे तीन संघ सेमीफायनलमध्ये जवळपास नक्की समजले जात आहेत. मात्र चौथ्या स्थानासाठी इंग्लंड, पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांमध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. या सामन्यात जर इंग्लंडचा पराभव झाला तर इंग्लंडची सेमीफायनल दरवाचे बंद होताना दिसतील. तर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यासाठी ते उघडताना दिसणार आहेत.

या परिस्थितीत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असणारा इंग्लंडचा संघ पाचव्या क्रमांकावर घसरला जाईल आणि पाचव्या क्रमांकावरील बांगलादेश चौथ्या क्रमांकावर. त्यामुळे बांगलादेश आपले उर्वरित तीन सामने जिंकल्यास त्यांचे १३ गुण होतील तर इंग्लंड आजचा सामना हरला आणि पुढील दोन्ही सामन्यांत विजय मिळवला तर त्यांचे १२ गुण होतील. त्यामुळे या पराभवाचा फायदा पाकिस्तानपेक्षा बांगलादेशला जास्त होणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेत पाकिस्तान देखील सेमीफायनलसाठी रेसमध्ये असून त्यांचे आणखी तीन सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांना देखील उर्वरित तीनही सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक