ICC World Cup 2019 : … म्हणून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बिना शूज घालून मैदानात फिरतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील दुसरा सेमीफायनल सामना ११ जुलै रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. त्याआधी आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. सामन्याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड या दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत असून य सामन्यात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मात्र याच दरम्यान एजबॅस्टनच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अनवाणी पायाने मैदानावर सराव करताना तसेच फिरताना दिसून आले. सराव करताना खेळाडू हे बूट घालून घालून सराव करत असतात. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडू अनवाणी फिरत होते. अनेक जण हे पाहून हैराण झाले होते.

गोल करून बसले
अनवाणी मैदानात आल्यानंतर हे खेळाडू बराच वेळ गोल करून शांत बसले होते. त्यानंतर सर्वांनी अनवाणी मैदानात फिरण्यास सुरुवात केली. यावर प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले कि, आम्ही मैदानातील आउटफील्डचा अंदाज घेत होतो.

ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधील कामगिरी
ऑस्ट्रेलिया हा वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आतापर्यंत ५ वेळा ही  स्पर्धा  जिंकली असून  १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ असे पाच वेळा त्यांनी हि स्पर्धा जिंकून घवघवीत यश मिळवलेले आहे. त्याचबरोबर १८७५ आणि १९९६ मध्ये ते उपविजेते होते. त्याचबरोबर त्यांनी विक्रमी आठ वेळा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यावेळी देखील ते वर्ल्डकप जिंकतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यनामा विषयक

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like