ICC World Cup 2019 : ‘हे’ काम करून पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना होत असून या सामन्यात काही चमत्कार घडला तर पाकिस्तान या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकेल, मात्र याची शक्यता फार कमी असून पाकिस्तान आधीच या स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे.

न्यूझीलंडचे सध्या पाकिस्तानपेक्षा दोन गुण जास्त असून आजच्या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानदेखील ११ गुणांवर जाईल. मात्र तरीदेखील न्यूझीलंडचा रनरेट जास्त असल्याने पाकिस्तान या स्पर्धेच्या सेमीफायनलमधून बाहेर पडणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध कमीतकमी ३०० धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. आतापर्यंत फक्त एकदाच २००८ साली न्यूझीलंडने आयर्लंडला २९० धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडत पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करावा लागेल यात काही शंका नाही.

रनरेटची चिंता नाही

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने या सामन्याविषयी बोलताना सांगितले कि, सध्या आम्ही रनरेटची चिंता करत नसून आम्ही या ठिकाणी जिंकण्यासाठी आलो आहोत आणि आजचा सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्व ताकद लावणार आहोत. त्यामुळे या स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर या सामन्यातील धावांविषयी बोलताना तो म्हणाला कि, या खेळपट्टीवर ४००, ५००, ६०० धाव तुम्ही केल्या तर काय तुम्ही समोरच्या संघाला ५० धावांत सर्वबाद करू शकता का ? खरे तर हे अवघड आहे मात्र आम्ही प्रयत्न देखील करणार आहे.

जिंकून करावी लागेल फलंदाजी

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आज लॉर्ड्सवर सामना होत आहे. ज्या सामन्यात त्यांचा पराभव झाल्यास किंवा विजयाची आकडेवारी चुकल्यास थेट वर्ल्डकपमधून बाहेर पडणार आहेत. जर उद्याच्या सामन्यात पाकिस्तान टॉस हारला आणि बांगलादेशने पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला तर तिथेच पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडणार. त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर सध्या एकच पर्याय आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला ४०० धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. त्यानंतर बांग्लादेशच्या संघाला ८४ धावांवर ऑलआऊट करावे लागेल त्याचबरोबर जर त्यांनी ३५० धावा केल्या तर बांगलादेशला ३८ धावांवर ऑलआऊट करावे लागेल. त्यामुळे हे गणित प्रत्यक्षात शक्य नाही. त्यामुळे पाकिस्तान जवळजवळ वर्ल्डकपमधून बाहेर पडलेलाच आहे.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार