ICC World Cup 2019 : ‘भारत- इंग्लंड’ सामन्यात सामन्याच्या तिकीटांसाठी ‘मारामारी’, एक तिकीट दीड लाखाच्या ‘घरात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विंडीजचा १२५ धावांनी दणदणीत पराभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असून उद्या भारताविरुद्ध होणारा सामना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असून या सामन्यात करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे.

मात्र तरीदेखील त्यांचे समर्थक त्यांना सपोर्ट करताना दिसून येत आहे. या सामन्यासाठी तिकिटे देखील मोठ्या प्रमाणावर विकली गेली असून एका तिकिटासाठी प्रेक्षक सहापट अधिक पैसे मोजण्यासाठी तयार आहेत. काही प्रेक्षकांनी एका तिकिटासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजल्याचे देखील दिसून आले आहे.

सहापट अधिक दर

या सामन्यासाठी उपलब्ध असणारी सर्व तिकिटे विकली गेली आहेत. मात्र ज्या लोकांनी हि तिकिटे खरेदी केली आहेत मात्र त्यांना सामना पाहण्याची इच्छा नाही ते आता हि तिकिटे ऑनलाईन वेबसाईट्सद्वारे विकत आहेत. २३५ पाउंड मध्ये खरेदी केलेलं तिकीट आता १३०० पाउंड्सपर्यंत विकले जात आहे. म्हणजेच भारतीय रुपयांत सांगायचे झाले तर २० हजार रुपयांचे तिकीट नागरिक १ लाख १३ हजार रुपयांमध्ये खरेदी करत आहेत. त्याचप्रमाणे १५० पाऊंडचे गोल्ड तिकीट ९०० पाउंड्सपर्यंत विकले जात आहे. म्हणजेच भारतीय रुपयांत १३ हजार रुपयांचे तिकीट ७८ हजार रुपयांत खरेदी करत आहेत.

भारतीय सर्वात पुढे

या सामन्यासाठी तिकीट खरेदीमध्ये भारतीय सर्वात पुढे आहेत. इंग्लंडच्या प्रेक्षकांपेक्षा भारतीय प्रेक्षकांनी या सामन्यासाठी तिकिटे खरेदी केली आहेत. जवळपास ५५ टक्के तिकिटे भारतीय प्रेक्षकांनी खरेदी केली आहेत. एजबॅस्टन मध्ये होणाऱ्या या सामन्यात मैदानाची क्षमता २४२०० इतकी आहे.

दरम्यान, इंग्लंडची करो किंवा मरो अशी परिस्थिती या सामन्यात निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रेक्षक या सामन्याची वाट पाहत आहेत.

चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

अशोक चव्हाणांना ८ वर्षांत न जमलेले ‘ते’ काम १ महिन्यात केले : खासदार चिखलीकर

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन