ICC World Cup 2019 : मॅच आणि सुपर ओव्हर ‘टाय’ तरीदेखील इंग्लंड विश्वविजेते कसे ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचा फायनल सामना काल इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये पार पडला. अत्यंत रोमहर्षक आणि शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्यात कोण विजयी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच फायनल सामना टाय झालेला पाहायला मिळाला. मात्र तरीदेखील या सामन्यात इंग्लंड जिंकला. सामना टाय झाल्यानंतर नियमांनुसार सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र ती देखील टाय झाली आणि अखेर इंग्लंडने या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मात्र सामना आणि सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर देखील इंग्लंड कसे जिंकले हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडला विजयासाठी २४२ धावांची गरज होती. मात्र इंग्लडला देखील ५० षटकांत २४१ धावाच करता आल्या. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यामध्ये इंग्लंडने १५ धावा केल्या. त्यानंतर विजयासाठी १६ धावांची गरज असताना न्यूझीलंडला देखील १५ धावाच करता आल्या.

...और टूट गया न्यूजीलैंड का सपना!

बाउंड्रीच्या आधारे नियम

सामना आणि सुपर ओव्हर दोन्ही टाय झाल्यानंतर ज्या संघाने जास्त बाउंड्री मारल्या आहेत त्या संघाला विजयी घोषित करण्यात येते. त्यामुळे याआधारे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. इंग्लंडने आपल्या डावात एकूण २६ बाउंड्री मारल्या होत्या तर न्यूझीलंडने केवळ १७ यामुळे या गणिताच्या आधारे इंग्लंड विजय झाला.

इंग्लंडच्या डावातील एकूण बाउंड्री

२२ चौकार , २ षटकार

२ चौकार (सुपर ओवर मध्ये )

न्यूझीलंडच्या डावातील एकूण बाउंड्री

१४ चौकार , २ षटकार

१ षटकार (सुपर ओवर मध्ये)

हा आहे आयसीसीचा नियम

आयसीसीच्या नवीन नियमांनुसार जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळून त्या सामन्याचा निकाल काढला जातो. मात्र त्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली तर ज्या संघाने सर्वात जास्त चौकार आणि षटकार मारले आहेत त्या संघाला विजयी घोषित करण्यात येते. त्याच आधारे काल झालेल्या फायनल सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. मात्र त्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी आयसीसीच्या या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. न्यूझीलंडचे माजी खेळाडूं स्कॉट स्टायरिस, स्टीफन फ्लेमिंग यांच्याबरोबरच अनेकांनी या नियमांवर टिका केली आहे.

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या