भारताला मोठा धक्‍का : सरावादरम्यान कॅप्टन विराट कोहली जखमी

लंडन : वृत्‍तसंस्था – वर्ल्डकप सुरू होण्यापुर्वीच भारतीय संघाला मोठा धक्‍का बसला आहे. सरावादरम्यान भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली जखमी झाला आहे. शनिवारी साऊथेम्प्टन येथे भारतीय संघ सराव करीत असताना तो जखमी झाला.

सरावामध्ये कोहलीने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीची प्रॅक्टीस केली. मात्र, सरावादरम्यान त्याच्या अंगठयाला दुखापत झाली आहे.भारताचा दि. 5 जून रोजी बलाढय दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. त्यापुर्वीच सरावादरम्यान कोहलीच्या उजव्या हाताच्या अंगठयाला दुखापत झाल्याने भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सरावादरम्यान दुखापत झाल्यानंतर विराट कोहली पुन्हा खूप वेळ झाला तरी परतलाच नाही. संघोच फिजियोथेरेपिस्ट पॅट्रिक फारहार्ट यांच्याकडून विराट उपचार घेत होता. अंगठयावर स्प्रे मारल्यानंतर देखील अंगठा खुप दुखत असल्याने अंगठयाला बर्फाचा शेक देण्यात आला.

अंगठयाची दुखापत कितपत गंभीर आहे हे समजू शकलेले नाही. मात्र, विराट कोहलीच्या दुखापतीबाबत भारतीय संघाकडून अद्याप काहीएक अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.