ICC World Cup 2019 : तब्बल ८ वेळा सेमीफायनलमध्ये प्रवेश करूनही ‘हा’ संघ अद्याप वर्ल्डकपपासून ‘वंचित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील चारही सेमीफायनलमधील संघांची नावे नक्की झाली असून यात ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये ८ व्यांदा प्रवेश केला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने देखील ८ व्यांदा या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांना एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. त्यांना फक्त एकदाच अंतिम सामन्यात प्रवेश करता आला होता.

२००७ पासून सलग चार वेळा त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र फक्त २०१५ मध्ये मायदेशात खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश करता आला होता. मात्र त्यांना त्यात विजेतेपद पटकावता आले नव्हते. यावर्षी देखील ते विजेतेपदापासून दोन पावले दूर असून यावेळी ते विजय साजरा करतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. २०१५ मध्ये अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

या स्पर्धेत न्यूझीलंडने ९ सामन्यांपैकी ५ सामन्यांत विजय मिळवला असून गुणतालिकेत ते ११ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे पाकिस्तानला मागे टाकून सेमीफायनलमध्ये जागा मिळवलेल्या न्यूझीलंडसाठी यावेळी हि उत्तम संधी आहे.

सर्वात जास्त वेळा सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारे संघ

ऑस्ट्रेलिया ८ वेळा

न्यूझीलंड ८ वेळा

भारत ७ वेळा

पाकिस्तान ६ वेळा

इंग्लंड ६ वेळा

वेस्टइंडीज ४ वेळा

श्रीलंका ४ वेळा

साउथ अफ्रीका ४ वेळा

केनिया १ वेळा