Video : वर्ल्डकपचा ‘सामना’ ते ‘पेप्सी’ची जाहिरात, ८७ वर्षाच्या ‘चारूलता’ आजी बनल्या ‘स्वॅग स्टार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या बर्मिंगहम स्टेडियममध्ये बांगलादेश विरोधात झालेल्या भारताच्या सामन्यात सर्वात जास्त फाॅॅर्ममध्ये कोण होत्या तर त्या चारुलता पटेल आजी. त्यांचा व्हिडिओ या मॅचनंतर जोमाने व्हायरल झाला. घडले ही तसंच. सामना संपल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या आजींची भेट घेतली. त्यामुळे सर्व जगात या आजी भलत्याच प्रसिद्ध झाल्या. म्हणूनच पेप्सिकोने त्यांना त्यांच्या जाहिरातीत सहभागी करुन घेतले आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्या दरम्यान ८७ वर्षीय या आजी उत्साहात वुवुजेला (भोंगा) वाजवताना दिसत होत्या. आता पेप्सीकोने या आजींना त्यांच्या जाहिरातीत स्थान दिले आहे. पेप्सीच्या स्वॅग कॅम्पेन मध्ये चारुलाता आजींना ‘स्वॅग स्टार’ बनवण्यात आले आहे.

काही दिवसांपुर्वी अमूलने एक डूडल बनवून क्रिकेटने या सुपर फॅनचा सन्मान केला होता. ज्यात चारुलता आजींना ‘ग्रँड मॉं इंडिया’ सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पेप्सीने देखील आजींना आपल्या जाहिरातील सहभागी करुन घेतले आहे. तर चारुलता आजींना कोहलीने वचन दिलंय की पुढील सामन्यापासून सामना पाहण्यासाठी त्यांना विराट तिकीट देणार आहे.

विराटने त्यांच्या भेटीनंतर आजींना भेटतानाचे फोटो ट्विटवर शेअर केले होते. त्यात विराटने लिहिले होते, मी मला मिळणाऱ्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी माझ्या सर्व चाहत्यांना धन्यवाद देतो विशेष करुन चारुलता आजींना. ८७ व्या वर्षी मी असा ताकद आणि उत्साह पाहिला नव्हता. वय फक्त एक संख्या असते. उत्साह तुम्हाला उंचीवर घेऊन जातो. त्यांच्या आशिर्वादाने आम्ही पुढील टप्प्यात पोहचलो.

पेप्सिकोच्या प्रवक्तांनी सांगितले की, खेळाप्रती त्यांचे असलेले प्रेम जगाला दाखवते की जीवनात अद्भुत क्षण जगण्यासाठी वय बाधा आणत नाही.

आरोग्यविषयक वृत्त

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय