ICC World Cup 2019 : बांग्लादेशच्या ‘या’ खेळाडूकडे रोहित शर्माचा ‘रेकॉर्ड’ मोडण्याची ‘नामी’ संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना होत असून बांगलादेशचा या स्पर्धेतील हा शेवटचा सामना असून या सामन्यात बांगलादेशचा फलंदाज शाकिब अल हसन याच्याकडे भारताच्या रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. या सामन्यात त्याने फलंदाजीला उतरताच ३ धावा केल्यानंतर तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर जाऊन पोहोचेल.

image.png

या स्पर्धेत भारताच्या रोहित शर्मा याने आतापर्यंत ८ सामन्यात ५४४ धावा केल्या असून बांग्लादेशच्या शाकिब अल हसन याने ८ सामन्यात ५४२ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज शेवटच्या सामन्यात त्याला रोहितचा विक्रम मोडण्याची संधी आहे. या स्पर्धेत बांगलादेशची कामगिरी विशेष झाली नसून ८ सामन्यात त्यांनी ३ विजय मिळवले असून ४ सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

७ गुणांसह ते गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असून त्यांचा या स्पर्धेतील प्रवास संपला असून आज ते आपला शेवटचा सामना खेळतील. या स्पर्धेत शाकिब अल हसन जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत ५४२ धावांसह २० विकेट देखील घेतल्या आहेत. त्याचबरोबर तो बांगलादेशचा एकमेव खेळाडू आहे ज्याने वर्ल्डकप स्पर्धेत १००० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वर्ल्डकपमध्ये ३० विकेट घेणारा बांगलादेशचा एकमेव खेळाडू झाला आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात पाकिस्तानला बांगलादेशवर मोठा विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. मात्र प्रत्यक्षात हे शक्य नसल्याने पाकिस्तानदेखील आज या स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय