World Deaf Week | ईयरफोनचा करू नका जास्त वापर, ऐकू येताहेत चित्रविचित्र आवाज, जाणून घ्या काय आहे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – World Deaf Week | ईयर फोनचा जास्त वापर करण्याने तरूण टिनिटस आजाराला बळी पडत आहेत. या आजारात रूग्णांच्या कानांमध्ये सूं…सूं… असा विचित्र अवाज सतत घुमत राहतो, जो त्यांना शांत झोपू देत नाही आणि कोणत्याही कामात लक्ष लागू देत नाही. सर्वात आश्चर्यकारक बाब ही आहे की एलएनजेपी हॉस्पिटलच्या नाक-कान-घसा तज्ज्ञांच्या ओपीडीमध्ये या आजाराचे रूग्ण पूर्वी एक-दोन येत होते, आता दररोज दोन ते तीन केस येत आहेत. ते सुद्धा कोणत्याही बहिरेपणा किंवा आजाराशिवाय. अगोदर (World Deaf Week) जास्त वयाच्या लोकांमध्ये हा रोग दिसून येत होता. आता तज्ज्ञसुद्धा या आजारामुळे चिंतेत आहेत.

100 पैकी बरे 2 रूग्ण बरे होतात
यामध्ये सुद्धा चिंता करणारी बाब ही आहे की 100 पैकी अवघे दोन रूग्ण बरे होत आहेत. डॉक्टरांकडे यावर कोणतेही अचूक औषध नाही. परंतु डॉक्टर जी औषधे देत आहेत ती सुद्धा 100 पैकी दोन जणांवर काम करत आहेत.

तरूणांनी ईयरफोनचा करून नये जास्त वापर : डॉ. विक्रम
एलएनजेपी हॉस्पिटलचे नाक-कान-घसा रोगतज्ज्ञ डॉ. विक्रम यांच्यानुसार, हे खुप चिंताजनक आहे की, तरूणांमध्ये हा आजार दिसून येत आहे.
ईयरफोनचा सतत वापर केल्याने तरूण या आजाराला बळी पडत आहेत.

या आजाराची सर्वांत चिंतादायक बाब ही आहे की, 100 पैकी दोनच रूग्ण औषधांनी बरे होत आहेत.
अशावेळी तरूणांना आवाहन आहे की, त्यांनी ईयर फोनचा जास्त वापर करू नये. (World Deaf Week)

Web Title :- World Deaf Week | world deaf week weird voices being heard by youth due to excessive use of earphones

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Renukamata Temple | ‘रोप-वे’ने जोडले जाईल रेणुकामाता मंदिर, लाखो भक्तांना मोठा दिलासा

Android Version | आजपासून जुन्या फोनवर चालणार नाही Gmail, यूट्यूबसह गुगलचे कोणतेही अ‍ॅप! जाणून घ्या कारण

Dombivli Gangrape Case | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून वापर