वाईट बातमी : समोर आला हा धक्कादायक रिपोर्ट ! 2025 पर्यंत 10 पैकी 6 लोकांची जाईल नोकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीमुळे जगभरातील लाखो-करोडो लोकांची नोकरी गेली आहे. अजूनही नोकर्‍यांवरील संकट कायम आहे. आता आणखी एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या रिपोर्टनुसार, 2025 पर्यंत प्रत्येक 10 पैकी 6 लोक नोकरी गमावू शकतात. याचे कारण मशीन आणि माणसांद्वारे कामात लागणारा वेळ सांगितले जात आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनापूर्वी आणि कोरोनादरम्यान मशीन्सच्या वापरात वेग आला आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांना नोकरीवर पाणी सोडावे लागेल. ही बाब 19 देशांमध्ये प्राईस वॉटर हाऊस कूपर कंपनीत काम करणार्‍या 32,000 कर्मचार्‍यांवर करण्यात आलेल्या सर्वेनंतर समोर आली आहे.

जाणून घ्या पूर्ण माहिती
सर्वेमध्ये सहभागी जगभरातील 40 टक्के कर्मचार्‍यांना असे वाटत आहे की, ते येणार्‍या 5 वर्षात आपली नोकरी गमावू शकतात. तर, 56 टक्के लोकांना वाटते की, ते भविष्यात सुद्धा मोठ्या कालावधीपर्यंत रोजगाराचे पर्याय मिळवू शकतात. 60 टक्केपेक्षा जास्त लोकांनी सरकारला नोकरी सुरक्षित करण्याचे आवाहन केले आहे. जगव्यापी लॉकडाऊनमध्ये 40 टक्के लोकांनी आपले डिजिटल स्किल चांगले केले, तर 77 टक्के लोक काही नवीन शिकण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी तयार आहेत.

रिपोर्टनुसार, 80 टक्के लोक नवीन तंत्रज्ञानाला अनुकुल आपली क्षमता वाढवत आहेत. ही नवी टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी आश्वस्त आहेत. मागील डब्ल्यूएफच्या एका रिपोर्टनुसार, मशीन्स आणि आर्टिफिशियल इन्टेलिजन्सवर वाढत्या अवलंबत्वाने 85 मिलियन नोकर्‍यांच्या नुकसानीचा धोका वाढवला आहे. याचवेळी 9.7 कोटी रोजगार निर्मिती होणार असल्याचे म्हटले आहे.