‘वर्ल्ड इमोजी डे’निमित्त Google आणि Apple नं केली नवीन इमोजीज लॉन्च करण्याची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज वर्ल्ड इमोजी डे आहे आणि या निमित्ताने कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी जारी करत आहे. अँपल आणि गुगलने नवीन इमोजी आणण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकन टेक कंपनी अँपलने म्हटले आहे की, कंपनी १३ नवीन इमोजी सादर करेल. आयफोन, आयपॅड आणि अँपल वॉचसाठी नवीन इमोजी जारी करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मात्र ते काही काळानंतर तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये मिळतील. अलीकडेच अँपलने iOS14 ची घोषणा केली आहे आणि या अपडेटसोबतच नवीन इमोजीसुद्धा दिले जातील.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन इमोजींमध्ये ट्रान्सजेंडर सिंबॉल, पिन्चड फिगर, बुमरँग, डोडो, लंग्स, निन्जा आणि अ‍ॅनाटॉमिकल हार्ट सारख्या इमोजींचा समावेश आहे. आगामी काळात कंपनी iOS अपडेटसह आयफोन, आयपॅड आणि मॅक युजर्सला हे इमोजी दिले जातील.

गुगलबद्दल बोलताना कंपनीने म्हटले आहे की, कंपनी ११३ नवीन इमोजी जारी करेल जे Emoji 13.0 व्हर्जनचे असतील. मात्र त्यांना Android 11 अपडेटसह युजर्सच्या डिव्हाइसमध्ये दिले जाईल.

तुम्ही अँड्रॉइड वापरत असल्यास बीटा प्रोग्राम अंतर्गत Android 11 इन्स्टॉल केले, तर तुम्ही या इमोजी वापरू शकता. हे इमोजीज तुम्ही फायनल अँड्रॉइड व्हर्जनसह ऑटोमॅटिक वापरू शकता.

अँपलने अलीकडेच iOS 13.6 चे अपडेट दिले आहे, ज्यात अनेक नवीन फीचर्स आहेत. यात कार की आणि हेल्थ अ‍ॅपमधील नवीन फीचर्स आणि इम्प्रुव्हमेंट्स मुख्यतः समाविष्ट आहेत. मात्र तुम्हाला यासह नवीन इमोजीज मिळणार नाहीत.