पर्यावरणमंत्री जावडेकर यांनी रोपासोबत काढला सेल्फी ; मोदी म्हणाले रोपाला झाड बनवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने एक नवीन मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेमध्ये आपल्याला निसर्गाशी संबंधित कोणत्याही गोष्टीसोबत सेल्फी काढायची आहे. जावडेकर यांनी ट्विट करून म्हंटले की, आम्ही लोकांसाठी रोपं लावा हा कार्यक्रम सुरु केला आहे. ज्यामध्ये लोकांनी सेल्फी घेऊन #SelfieWithSapling हा हॅशटॅग वापरुन फोटो शेअर करायचा आहे.

आता पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर माजी क्रिकेटर कपिल देव आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्यासोबत या नवीन मोहिमेच्या माध्यमातून रोपं लावणार आहेत.

प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवरील एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्यावरील आहे. व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी म्हणत आहेत की, फक्त रोपं लावून काय होणार नाही, लोकांनी त्या रोपाचे रूपांतर झाडामध्ये होईपर्यंत त्याची देखभाल केली पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, आपला ग्रह आणि पर्यावरण खूप अमूल्य आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या ग्रहाला स्वच्छ ठेवण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. पर्यावरणासोबत चालल्यामुळेच आपल्याला चांगल भविष्य मिळू शकत.

या सेल्फी विथ सिपलिंग मोहिमेत प्रकाश जावडेकर यांनी वायू प्रदूषणासंबंधी चर्चा केली आणि लोकांना वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचविण्याचे आवाहन केले. पुढे जागतिक तापमान वाढीसंबंधी चिंताही व्यक्त केली आहे.

SelfieWithSapling ही मोहीम अफरोज शाह यांच्याकडून प्रेरित आहे. अफरोज मुंबईचे रहिवासी असून व्यवसायाने वकील आहेत. अफरोज यांनीच मुंबईच्या वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहीम राबविली. हे एक मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील कचरा हटवण्याची मोहीम आहे.