World Expensive Share | गाडी-बंगला, नोकर-चाकर, बँक बॅलन्स… ‘या’ 1 शेअरच्या किमतीत सर्वकाही शक्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – World Expensive Share | या कंपनीचा केवळ एक शेअर तुम्हाला करोडपती बनवू शकतो. या शेअरची जेवढी किंमत आहे, तेवढी कमाई सामान्य माणूस आयुष्यभर करू शकत नाही. या एका शेअरमुळे आयुष्य आर्थिकदृष्ट्या चांगले होऊ शकते. (World Expensive Share)

 

येथे आम्ही जगातील सर्वात महाग शेअरबद्दल सांगत आहोत. बर्कशायर हॅथवे इंक (Berkshire Hathaway Inc.) हा जगातील सर्वात महाग शेअर आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत सध्या 3.33 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या एका शेअरमध्ये तुम्ही घर, गाडी, नोकरदार, बँक बॅलन्स, चैनीच्या सर्व गोष्टी गोळा करू शकता.

 

सामान्य माणसाला हा शेअर विकत घेणे अवघड

हा शेअर खरेदी करणे हे सामान्य माणसाचे स्वप्नच राहू शकते. वॉरेन बफे (warren buffett) हे बर्कशायर हॅथवे इंक कंपनीचे प्रमुख आहेत. आजच्या तारखेला त्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. Berkshire Hathaway Inc. ही जगातील सर्वात महागडा शेअर असलेली कंपनी आहे. त्याचे प्रमुख वॉरेन बफे आहेत. (World Expensive Share)

Berkshire Hathaway Inc. स्टॉकची किंमत सध्या 4,17,250 डॉलर (म्हणजे 3,33,43,907 रुपये) आहे. या वर्षी 20 एप्रिल रोजी या शेअरची किंमत 523550 डॉलर (म्हणजे 4,00,19,376 रुपये) होती. म्हणजेच गेल्या तीन महिन्यांत हा शेअर सुमारे 20 टक्क्यांनी घसरला आहे.

 

वॉरेन बफे यांची कंपनीत 16% हिस्सेदारी

विशेष म्हणजे, असे म्हटले जाते की, जगभरातील लोक दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना फॉलो करतात.
वॉरेन बफेट ज्या कंपनीत गुंतवणूक करतात, तिचे दिवस बदलतात.
फोर्ब्जनुसार, वॉरेन बफेट यांची बर्कशायर हॅथवेमध्ये 16 टक्के भागीदारी आहे.

कंपनीचा बहुतांश व्यवसाय अमेरिकेत आहे. कंपनीत सुमारे 3,72,000 कर्मचारी काम करतात.
बर्कशायर हॅथवे इंक. ची अमेरिकेशिवाय चीनमध्येही विस्तार करण्याची योजना आहे.
1965 मध्ये वॉरेन बफेट यांनी या टेक्सटाईन कंपनीची कमान हाती घेतली तेव्हा तिच्या शेअरची किंमत 20 डॉलरपेक्षा कमी होती.

 

Web Title :- World Expensive Share | world most expensive stock berkshire hathaway inc price over rs 3cr owner warren buffett

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा