Coronavirus : ‘कोरोना’मुळं जगाची हालत ‘वाईट’, चीनमध्ये पुन्हा वटवाघूळांची विक्री होतेय

नवी दिल्ली  :  वृत्तसंस्था –   एकीकडे जगातील एक मोठा भाग कोरोना विषाणूच्या संकटाने झगडत आहे, तर दुसरीकडे चीनच्या मांस बाजारात पुन्हा एकदा वन्य प्राण्यांची विक्री सुरू झाली आहे. माहितीनुसार, कोरोनाच्या संकटातून उभारल्यानंतर चीनच्या बाजारात पुन्हा वटवाघूळ आणि इतर प्राण्यांची विक्री सुरू झाली आहे. दरम्यान, चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्याने चीनने अनेक कुप्रसिद्ध बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. असे म्हंटले जाते कि, केवळ वुहानमधील सी फूड बाजारातूनच कोरोना विषाणू मानवांमध्ये पसरला. कोरोना विषाणूचा संबंध वटवाघुळाशी जोडला गेला होता. यामुळे काही महिन्यांपूर्वी वन्य प्राण्यांची विक्री थांबविण्यात आली होती.

माहितीनुसार, चीनमध्ये पुन्हा एकदा कुत्री, मांजरी, वटवाघुळासारखी इतर वन्य प्राण्यांची विक्री सुरु झाली आहे. दक्षिण-पश्चिम चीनच्या गुइलिन आणि डोनगुआनमध्ये अशा बाजारपेठा उघडल्या गेल्या. डोनगुआनच्या बाजारात वटवाघूळ विक्रीच्या जाहिरातीही दिसू लागल्या.

वास्तविक, चीनमध्ये वन्य प्राण्यांना अन्न आणि पारंपारिक औषध म्हणून वापरण्याची प्रथा आहे. इथले लोक पारंपारिक औषध म्हणून वटवाघुळाचा वापर करतात. परंतु कोरोना विषाणू समोर आल्यानंतर चिनी सरकारने त्यांच्या विक्रीवर कडक कारवाई केली. एवढेच नव्हे तर अस्वच्छ मार्गाने मांस विक्रीची बाब पुन्हा एकदा चीनच्या मांस बाजारात समोर येत आहे. माहितीनुसार, मांस बाजार पुन्हा सुरू करून चीनने कोरोना विषाणूविरूद्ध आपला ‘विजय’ दर्शविला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे सध्या भारतसह जगातील अनेक देश आणि शहरे लॉकडाउन म्हणून करण्यात आली आहेत. इटली, स्पेनमधील कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ब्रिटन आणि अमेरिकेतही भयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे. जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 677,660 पेक्षा जास्त आहे, तर मृतांचा आकडा 31,737 वर पोहोचला आहे.