जगप्रसिध्द गीतकारानं प्रेक्षकाची माफी मागत स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगप्रसिद्ध गीतकार आणि गायक डेविड ओलने यांचे वयाच्या 71 वर्षी निधन झाले. फ्लोरिडा येथे परफॉर्मन्स करताना स्टेजवर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी प्रेक्षकांची माफी मागत डोळे बंद केले आणि अखेरचा श्वास घेतला.

डेविड यांच्या निधनाची बातमी त्यांच्यासोबत परफॉर्म करणाऱ्या दोन संगीतकारांनी त्यांच्या चाहत्यांना दिली. डेविड यांच्या बाजूला बसलेल्या एका संगीतकाराने फेसबुकवर पोस्ट करत म्हटले की, ‘ओलने त्यांचे तिसरे गाणे सादर करत असताना अचानक थांबले आणि प्रेक्षकांची माफी मागत डोळे बंद केले.’

डेविड यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाही. एका अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, सांता रोजा बीचवर परफॉर्म करत असताना डेविड यांना ह्रदयविकाराचा झटका आला.

डेविड ओलने हे नॅशविले म्यूझिक सीनचे प्रमुख सदस्य होते. त्यांची गाणी अनेक देश आणि कलाकारांद्वारे रेकॉर्ड केले गेले होते. 1980 च्या दशकात करिअर सुरु करण्याआधी त्यांनी ‘द एक्स रे’ नावाचा रॉक बँड तयार केला होता. या बॅंडमधून दोनहून अधिक अब्लम त्यांनी प्रदर्शित केले होते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !