World First Aid Day 2021 | जखमेवर थूंकणे-भाजल्यावर बर्फ, उपचाराच्या ‘या’ 7 पद्धती एकदम चुकीच्या; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – World First Aid Day 2021 | फर्स्ट एड बॉक्सचे महत्व लोकांना समजावे म्हणून 14 सप्टेंबरला फर्स्ट एड दिन नुकसातच साजरा करण्यात आला. मात्र, या छोट्या मेडिकल किटचे बेसिक नियम माहिती असूनही काही लोक दुर्घटनेत अशा गोष्टींचा वापर करतात ज्यांना कोणताही शास्त्रीय आधार (World First Aid Day 2021) नाही.

1. नाकातून रक्त वाहणे –
शरीरात जास्त उष्णता किंवा अ‍ॅलर्जीमुळे काही लोकांच्या नाकातून रक्त वाहते. अशावेळी लोक डोक्यावर सरळ झोपण्याचा सल्ला देतात. परंतु यामुळे नाकातून येणारे रक्त थांबणार नाही, तर घशात जाईल. हे गिळल्याने उलटी होऊ शकते. यासाठी पुढील बाजूस थोडे झुका आणि नाकाचा वरचा भाग हलकेच पकडा. अनेक बाबतीत हे रक्त 10 मिनिटानंतर आपोआप बंद होते.

2. भाजल्यानंतर बर्फ ठेवणे –
काही लोक भाजल्यानंतर त्या भागावर बर्फ रगडतात. असे करणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे त्वचा डॅमेज होऊ शकते. तसेच लोणी किंवा टूथपेस्टदेखील लावू नये. थोडावेळ थंड पाणी टाकू शकता. यानंतर स्वच्छ आणि कोरड्या फडक्याने स्वच्छ करा.

3. जखमी पडलेल्या व्यक्तीला चालवणे –
तुम्ही पाहिले असेल नेहमी लोक दुर्घटनेनंतर जखमी व्यक्तीला थोडे चालण्यास सांगतात. अनेकदा जखमी व्यक्ती स्वता चालून पाहतो की तो व्यवस्थित आहे किंवा नाही. असे करणे सुद्धा चुकीचे आहे. असे केल्याने घातक स्पायनल कॉर्डला दुखापत होऊ शकते. अशावेळी त्या व्यक्तीला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जा.

4. मुरगळणे किंवा फ्रॅक्चरवर शेकणे –
मुरगळणे किंवा फ्रॅक्चरमध्ये वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक गरम कपड्याने शेकतात. हे चुकीचे आहे. शेकल्याने सूजची समस्या आणखी वाढेल. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने सुमारे 20 मिनिटे आईस पॅक लावा.

5. जखमेवर थूंकणे –
तुम्ही लोकांना हे सांगताना ऐकले असेल की, लाळेतील तत्व जखमेतील किटाणू मारतात. परंतु यामध्ये काहीही सत्य नाही. मनुष्यात लाळेत अगोदरच बॅक्टेरिया असतात जे जखम गंभीर बनवू शकतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

6. जखमेवर बँडेज बांधणे –
काही लोक जखमेवर अँटीबॅक्टेरियल लेप लावल्यानंतर त्यावर बँडेज लावतात.
परंतु यामुळे जखम भरण्यास वेळ लागतो. यासाठी जखम चांगली स्वच्छ करा,
नंतर तिच्यावर अँटीबॅक्टेरियल लेप लावा आणि गरज असेल तरच बँडेजचा वापर करा.
ताज्या हवेत जखम लवकर बरी होते.

7. डोळे चोळणे –
अनेकदा डोळ्यात कचरा गेल्यावर लोक डोळे चोळतात.
असे केल्याने एखाद्यावेळी तुमचे डोळे कायमसाठी खराब होऊ शकतात.
अशावेळी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.

Web Titel :- World First Aid Day 2021 | Spit-wound ice on the wound, 7 ‘methods’ of treatment are completely wrong; Find out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणेरी निषेध ! चुक नसताना गाडी उचलल्याने पठ्ठ्यानं निषेध म्हणून गाडीचं ‘स्मारक’ उभारलं

Time Magazine Top 100 influential list | टाइम मॅगझीन लिस्ट ! जगातील 100 प्रभावशाली लोकांमध्ये PM मोदी, CM ममता बॅनर्जी, ‘सीरम’चे CEO अदर पूनावाला

NSC | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ ‘स्कीम’द्वारे मिळवा टॅक्स बेनिफिट आणि चांगला व्याजदर, जाणून घ्या पूर्ण माहिती