जगातील पहिलं-वहिलं सोन्याचं हॉटेल, जाणून घ्या एक रात्री ‘स्टे’ करण्यासाठीचा ‘रेंट’

हनोय : जगातील पहिले सोन्याचे हॉटेल व्हिएतनामची राजधानी हनोयमध्ये सुरू झाले आहे. येथे दरवाजे, कप, टेबल, खिडक्या, नळ, वॉशरूम, खाण्याची भांडी सर्वकाही सोन्याचे आहे. 2 जुलै म्हणजेच गुरूवारी या हॉटेलचा शुभारंभ झाला आहे.

या हॉटेलचे नाव आहे डोल्से हनोय गोल्डन लेक (Dolce Hanoi Golden Lake). या हॉटेलमध्ये गेटपासून कॉफी कपपर्यंत सर्व सोन्यापासून तयार केलेल आहे.

हे एक फाइव्ह स्टार हॉटेल आहे. जे 25 मजली आहे. या हॉटेलमध्ये 400 रूम आहेत. हॉटलच्या बाहेरच्या भिंतींवर सुमारे 54 हजार वर्ग फुट गोल्ड प्लेटेड टाइल्स लावण्यात आली आहे.

हॉटेल स्टाफचा ड्रेस कोडसुद्धा रेड आणि गोल्डन ठेवण्यात आला आहे. लॉबीमध्ये फर्नीचर आणि सजावटीमध्ये सुद्धा सोन्याची कलाकुसर आहे. जेणेकरून संपूर्ण हॉटेलमध्ये सोन्याची अनुभूती व्हावी.

वॉशरूममध्ये बाथटब, सिंक, शॉवरपासून सर्व अ‍ॅक्सेसरीज गोल्डन आहेत. बेडरूममध्ये सुद्धा फर्नीचर आणि सजावटीच्या सामानावर गोल्ड प्लेटिंग करण्यात आले आहे.

टेरेसवर इन्फिनिटी पूल आहे. येथून हनोय शहराचे सुंदर दृश्य दिसते. येथील भिंतींनासुद्धा गोल्ड प्लेटेड विटा लावण्यात आल्या आहेत.

पहिल्या दिवशी पाहुण्यांनी यामध्ये जास्त रूची दाखवली. येथे लोक आपले फोटो काढून घेत होते. या हॉटेलची निर्मिती 2009 मध्ये सुरू झाली होती. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर फ्लॅट्ससुद्धा बनवण्यात आले आहेत. जर कुणाला आपल्यासाठी फ्लॅट घ्यायचा असेल तर तोही येथे उपलब्ध आहे.

या हॉटेलला दक्षिण-पूर्व आशियाचे सर्वात लग्झरी हॉटेलचा पुरस्कार देण्यात आला आहे. होआ बिन ग्रुप आणि विनधम ग्रुपने मिळून हे हॉटेल बनवले आहे. या दोन्ही कंपन्या मिळून 2 सुपर 6 स्टार हॉटेल मॅनेज करत आहेत.

सोने मानसिक तणाव दूर करण्यासाठी मदत करते. यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. यासाठी हॉटेल व्यवस्थापनाने सोन्याच्या प्लेटींगचा जास्त वापर केला आहे.

डबल बेडरूम सुटमध्ये एक रात्र राहाण्यासाठी भाडे सुमारे 75 हजार रुपए आहे. तर हॉटेलच्या रूमचे सुरूवातीचे भाडे सुमारे 20 हजार रुपये आहे.

येथे 6 प्रकारचे रूम्स आहेत. सोबतच 6 प्रकारचे सुटसुद्धा आहेत. प्रेसिडेन्शियल सुटची किंमत 4.85 लाख रुपये प्रति रात आहे.

या हॉटेलमध्ये गेमिंग क्लबसुद्धा आहे, जो 24 तास खुला असतो. येथे कसिनो आणि पोकरसारखे गेम आहेत. ज्यावर तुम्ही जिंकल्यानंतर पैसेही कमावू शकता.