फूड सेफ्टी डे : निरोगी जीवनासाठी आवश्यक पौष्टिक आहार, WHO नं दिली ‘ही’ माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दरवर्षी दूषित आहारामुळे चार लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, दरवर्षी प्रत्येकी दहा जणांपैकी एकाच्या मृत्यूचे कारणही हेच आहे. तसेच दरवर्षी सुमारे सव्वा लाख मुले दूषित अन्न खाण्याने होणाऱ्या आजारांमुळे आपला जीव गमावतात.

दूषित आहाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी ७ जून रोजी वर्ल्ड फूड सेफ्टी डे साजरा केला जातो. यावर्षी डब्ल्यूएचओने लोकांना या समस्येबाबत ५ खास गोष्टी सांगितल्या आहेत.

1. स्वच्छता ठेवा – डब्ल्यूएचओने लोकांना स्वयंपाक करण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचा सल्ला दिला आहे. भांडी व्यवस्थित धुवा आणि आपले हात वारंवार धुवत राहा.
2. कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवा – कच्च्या भाज्या आणि शिजवलेल्या भाज्या वेगळ्या भांड्यांमध्ये ठेवणे आवश्यक आहे. त्यांना वेगवेगळ्या भांड्यांमध्ये धुवा आणि वेगवेगळ्या भांडीमध्येच शिजवा.
3. चांगल्या प्रकारे शिजवा – भाज्या चांगल्या प्रकारे शिजवणे आवश्यक आहे. बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आणि स्वादिष्ट आहाराचा आनंद घेण्यासाठी अन्न चांगले शिजवले पाहिजे.
4. ते सुरक्षित तापमानात ठेवा – खाण्याच्या वस्तू सुरक्षित तापमानात ठेवा. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ वेगवेगळ्या तापमानात ठेवणे आवश्यक आहे.
5. स्वच्छ पाणी आणि भांडी वापरा – स्वयंपाक करण्यासाठी स्वच्छ पाणी आणि भांडी वापरावीत.