‘कोरोना’च्या महामारीनंतर जागतिक महामंदी ! 8.5 ट्रिलियन डॉलरचे नुकसान, संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात विध्वंस झाला आहे. अनेक देशांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. ज्यामुळे उपासमार आणि इतर संकटं निर्माण होणार आहेत. सध्या कोविड-१९ मुळे जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. ज्याचा परिणाम देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. या साथीच्या आजारामुळे जगाचे ८.५ ट्रिलियन डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जर सर्व देशांनी एकत्र येत सदभावनेने सध्याची परिस्थिती हाताळली नाही, तर जागतिक महामंदीनंतर सर्वात मोठे नुकसान होण्याचे संकेत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अंटेनियो गुटेरस यांनी म्हंटले कि, कोविड-१९ मुळे मानवी क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सर्व तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीनंतरसुद्धा मनुष्य मोठ्या संकटाला सामोरे जात आहोत. त्यामुळे सर्व देशांनी एकत्र येत या संकटाचा सामना करण्याचे महत्त्व त्यांनी मांडले आहे.

अंटेनियो गुटेरस पुढे म्हणाले की, जर आपण आताच योग्य ती पावले उचलली नाहीत तर संपूर्ण जगाचे मोठे नुकसान होईल. ज्यामुळे प्रचंड उपासमार होण्याची शक्यता आहे. तब्ब्ल सहा कोटी लोकांना य संकटाने दारिद्र्यात ढकलले आहे. त्याचप्रमाणे जगातील १.६ अब्ज लोकांपैकी जवळपास निम्मे लोक बेरोजगार होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. १९३० मध्ये आलेल्या जागतिक महामंदीनंतर जगातील सर्वात मोठे नुकसान कोविड-१९ महामारीमुळे होण्याची शक्यता आहे. सुमारे ८.५ ट्रिलियन डॉलर इतके नुकसान होणार असून जागतिक आरोग्य व्यवस्था, प्रंचड मोठी विषमता यासारख्या मोठ्या संकटाचा सामना सर्वाना करावा लागणार आहे.

अनेक देशांमधील रोजगार आणि व्यवसाय हे त्या देशांमधील आरोग्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचे स्थैर्य यावर अवलंबून असतात. कोरोना विषाणूमुळे अभूतपूर्व संकट आपल्यासमोर येऊन ठाकले आहे. मात्र त्याचबरोबर सुरक्षित आणि समृद्ध जग नव्याने निर्माण करण्याचीही संधी असल्याचे अंटेनियो गुटेरस यांनी यावेळी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like