जागतिक आरोग्य दिन स्पेशल ; रोजच्या आयुष्यात ‘या’ गोष्टींचा समावेश करा आणि चिरायू व्हा..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यांमुळे हा दिवस आरोग्यासंदर्भात लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो. वर्ल्ड हेल्थ आर्गेनाईजेशन (World Health Organization) द्वारे पहिल्यांदा 1950 मध्ये वर्ल्ड हेल्थ डे साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून वर्षी 7 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये ‘वर्ल्ड हेल्थ डे’ म्हणून साजरा करण्यात येतो.

सध्याच्या या धावपळीच्या आयुष्यात काळजी घेण्यासाठी काही गोष्टींचे पालन केल्यास त्याचा फायदा आरोग्यासाठी होऊ शकतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, 5 उपायांचा आपल्या दिनचर्येत समावेश केले तर जवळपास 25 आजारांपासून स्वतःचा बचाव करता येऊ शकते.

उन्हात जास्त खाऊ नये

भूक नियंत्रित ठेवा आणि जास्त खाऊ नका. फिट राहण्यासाठी मानसिकरित्या हेल्दी डाएट घेण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. नेहमी तुम्ही आहारातून किती कॅलरींचे सेवन करता याबाबत लक्ष ठेवा. तुमच्या शरीराला आवश्यकतेनुसार कॅलरी दिल्याने तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच निरोगी राहण्यासही मदत होइल.

शांत आणि पूर्ण झोप

सर्वात आधी तुम्ही शरीराला शांत आणि पूर्ण झोप देणं गरजेचं असतं. रात्री शरीराला आराम देण्यासाठी असते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत जागणं टाळा. शरीराला फ्रेश आणि अक्टिव्ह ठेवण्यासाठी झोप उत्तम औषध आहे. कमी झोप घेतल्यामुळे मानसिक स्थितीवर त्याचा वाईट परिणाम होतो. याव्यतिरिक्त शरीराला वेदना आणि थकवा जाणवतो. वजन वाढतं आणि तणाव यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच अपूर्ण झोपेमुळे डायबिटीज, ऑस्ट‍ियोपोरोसिस, कॅन्सर आणि हार्ट अटॅक यांसारख्या आजारांचाही धोका वाढतो.

मानसिक आरोग्य सांभाळा

तणाव, चिंता किंवा डिप्रेशन यांसारखी लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरंचा सल्ला घ्या. तसेच एकटं राहण्याऐवजी तुमच्या जवळील व्यक्तींशी संवाद साधा. जर तुम्हाला मदतीची गरज असेल तर कोणताही संकोच मनात न ठेवता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्षं केल्याने अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्याने

प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ म्हणजेच, डाळ, दूध, दही, पनीर यांसारख्या डेअरी उत्पादनांचे सेवन करा. अंड्यांमध्येही मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं.

5. व्यायाम करा

दररोज व्यायाम करावा हे गरजेचे आहे. दररोज चालणे, पळणे, सायकल चालवणे, या सारख्या हलचालींच्या गोष्टी दिवसभरात होणे आवश्यकता आहे. व्यायाम फक्त तुम्हाला फिट राहण्यासाठी नाही तर हृदयाशी निगडीत आजार आणि कॅन्सर यांसारख्या आरोग्याच्या गंभीर समस्यांपासून दूर राहण्यासाठी मदत करतं. त्यासाठी व्यायामाचा डेली रूटिनमध्ये समावेश करावा.