Coronavirus : भारताच्या दबावापुढे झुकलं WHO, पुन्हा सुरू केली ‘या’ औषधाची ‘ट्रायल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन बाबत एक मोठी बातमी आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतापुढे गुडघे टेकले आहेत आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची कोरोना व्हायरस ट्रायल पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे. बुधवारी डब्ल्यूएचओने ट्विट करून याची माहिती दिली. नुकतेच डब्ल्यूएचओने सदस्य देशांना निर्देश जारी केले होते की, कोरोना व्हायरसच्या उपचारात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन धोकायदायक ठरू शकते. यासाठी याची ट्रायल बंद करा.

डब्ल्यूएचओने ट्विट करत म्हटले, उपलब्ध मृत्युदराच्या आकड्यांच्या आधारावर समितीच्या सदस्यांनी शिफारस केली आहे की, परीक्षण प्रोटोकॉलमध्ये दुरूस्ती करण्याचे कोणतेही कारण नाही. यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ट्रायल पुन्हा सुरू करता येईल. कार्यकारी गट यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

डब्ल्यूएचओने या औषधाची ट्रायल बंद करण्यास सांगितल्यानंतरही भारतीय संशोधकांनी या औषधावर संशोधनही केले आणि देशातील डॉक्टराना सांगितले की या औषधामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आपल्या ताज्या संशोधनात म्हटले आहे की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचे औषध घेतल्यावर कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका कमी झाल्याचे आढळले आहे.

यानंतर कोरोना व्हायरस महामारीच्या लढाईत भारताने डब्ल्यूएचओच्या विरूद्ध आवाज उठवला. भारताने आपले नवे निर्देश आणि शोधातून डब्ल्यूएचओला संकेत दिले की, कोरोना व्हायरसच्या लढाईत आता भारत एकटा लढा देईल. देशाच्या हितासाठी जे शोध आणि उपचार जरूरी असतील तेच केले जातील. सोबतच भारताच्या संशोधकांनी स्पष्ट केले की त्यांना डब्ल्यूएचओच्या सल्ल्याची काहीही गरज नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकार्‍यानुसार बहुतांश पश्चिमी देशांच्या संशोधकांनी आणि औषध कंपन्यांनी भारताच्या खुप स्वस्त औषधांना नेहमीच कमी लेखले आहे.

कोरोना व्हायरसचा उपचार मलेरियापासून बचाव करणार्‍या हायड्रोक्सीक्लोरोक्वीनने शक्य आहे. जर कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी या स्वस्त औषधाचा वापर वाढला तर पश्चिमी देशांतील औषध कंपन्यांचे करोडो रूपयांचे नुकसान होऊ शकते. याच कारणामुळे त्यांची लॉबी डब्ल्यूएचओवर दबाव तयार करून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या सर्व ट्रायल बंद करू इच्छित आहेत.