World Health Organization | जागतीक आरोग्य संघटनेने आत्मविश्वास वाढवला ! ‘2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – World Health Organization | कोरोनाच्या (Corona) ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron Covid Variant) जगभरात भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतात मगील काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. तिसरी लाट (Corona Third Wave) उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर हे कोरोना संकट नेमकं कधी संपणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. निर्बंधामुळे जसा अर्थव्यवस्थेला (Economy) फटका बसत आहे, तसा नागरिकांच्या नियमित जीवनाला देखील बसला आहे. कोरोना नेमका कधी संपणार यावर जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम (Dr. Tedros Adhanom) यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) अध्यक्ष डॉ. टेड्रोस म्हणाले, आज जगातला एकही देश कोरोनाच्या प्रभावापासून सुरक्षित राहिलेला नाही. पण जमेची बाजू ही आहे की आज आपल्याकडे कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. तसेच, कोरोनावर उपचार (Treatment) करण्यासाठी देखील औषधं हाती आहेत. मात्र, जगात जितकी जास्त असमानता असेल, तेवढा हा विषाणू आपण कल्पनाही करु शकणार नाही किंवा बचाव करु शकणार नाही अशा पद्धतीने घात होऊ शकतो, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

… तर कोरोनाचे संकट दूर होईल
कोरोनावर मात करायची असेल, तर आपल्याला असमानता नष्ट करावी लागेल, असं टेड्रोस म्हणाले. जर आपण आपल्यातली असमानता नष्ट केली, तर आपण हे कोरोनाचं संकट देखील नष्ट करु शकू. आपण कोरोना साथीच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना मला विश्वास वाटतो की आपण याच वर्षी 2022 मध्ये कोरोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न केले तर, असेही ट्रेड्रोस यांनी म्हटले.

70 टक्के लोकांचे लसीकरण हवे
यावेळी बोलताना टेड्रोस यांनी कोरोनाला पराभूत करायचे असेल, तर प्रत्येक देशातील किमान 70 टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत (Vaccinated) असायला हवी.
यासाठी सगळ्यांनी एकत्रपणे काम करुन हे जागतिक लक्ष्य साधायला हवं.
2022 च्या मध्यापर्यंत हे लक्ष्य आपण सगळ्यांनी मिळून साध्य करायला हवं, असं ते म्हणाले.

 

 

Web Title :- World Health Organization | World Health Organization dr tedros adhanom corona virus omicron variant corona epidemic will end 2022 says who director

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

APY | ‘या’ सरकारी योजनेत पती-पत्नी दोघांना मिळेल रक्कम, दर महिना कमावू शकता 10,000 रुपये; जाणून घ्या कसे?

 

OBC Reservation | केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी आरक्षणाचा बळी घेतला, विजय वडेट्टीवारांचा घणाखाती आरोप; म्हणाले – ‘…तर मंत्रिपदाचा त्याग करणार’

 

PM KISAN चा 10 वा हप्ता ! 11 कोटी शेतकर्‍यांना 1.8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर, पहा लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही