अमेरिकेच्या इदाहो येथे 2 विमानांची भीषण ‘टक्कर’, 8 जणांच्या मृत्यूची भीती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या उत्तर – पश्चिमी ताज्या इदाहो किंवा इदाहू मध्ये दोन विमानांची एकमेकांशी भीषण टक्कर झाली. या विमानांची टक्कर ‘Coeur d’Alene’ तलावावर झाली. तलावात पडल्याने आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी दुपारी हा विमान अपघात झाला. कुटेनाई काउंटी शेरीफ कार्यालयाचे लेफ्टनंट रायन हिगिन्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, यावेळी असा विश्वास व्यक्त केला हात आहे कि या क्षणी या विमान दुर्घटनेत कोणीही जिवंत बचावणार नाही . त्यांनी म्हंटले की, घटनास्थळावर दोन जणांची ओळख पटवून त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. इतर सहा पीडित अद्याप सापडले नाहीत, परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले जात आहे. यामध्ये वृद्ध आणि मुलांचा देखील समावेश आहे, परंतु अद्याप तपशील प्राप्त झाला नाही. सध्या शोध मोहीम सुरू आहे.

अमेरिकन मीडियाच्या वृत्तानुसार, हिगिंस म्हणाले की, विमाने शोधण्यासाठी एक टीम 127 फूट पाण्यात गुंतली आहे. माहितीनुसार फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्रवक्ते इयान ग्रेगोर यांनी सांगितले की या धडकेत सहभागी झालेल्या विमानांपैकी एक विमान Cessna 206 होते. मात्र, Cessna 206 शी टक्कर घेण्यारे विमान कोणते होते? याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.