‘हा’ आहे जगातील सर्वाधिक विकला जाणारा ‘स्मार्टफोन’, 4.63 कोटी लोकांनी केली ‘खरेदी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल तरुणांना नवनवीन स्मार्टफोन्सचे आकर्षण आहे. ज्याच्या – त्याच्या फीचरनुसार त्या फोनला पसंती दिली जाते. यादरम्यान, Omdia ने एक नवीन अहवाल प्रसिद्ध जारी केला आहे. ज्यात गेल्या वर्षात म्हणजेच 2019 म्हणजे जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनची यादी जाहीर करण्यात आली आहे. जाणून घेऊया या टॉप 5 स्मार्टफोनबद्दल

जगातील पाच सर्वाधिक विक्री करणाऱ्या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा गॅलेक्सी A20 पाचव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी या फोनच्या 1.92 कोटी युनिट्सची विक्री झाली.

या यादीमध्ये सॅमसंगचे गॅलेक्सी ए 50 मॉडेल चौथ्या क्रमांकावर आहे. ज्याची विक्री 2.42 कोटी युनिट्सची एवढी झाली आहे.

सर्वाधिक विक्री होणार्‍या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचाच गॅलेक्सी ए 10 मॉडेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी देशात 3.03 कोटी युनिट्सची विक्री झाली.

या यादीमध्ये अ‍ॅपलचा आयफोन 11 दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी या मॉडेलची एकूण 3.73 कोटी युनिट्सची विक्री झाली.

Omdia च्या अहवालानुसार आयफोन XR हा सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन आहे. 2019 मध्ये त्याने एकूण 4.63 कोटींची विक्री केली.