World Liver Day 2021 : ‘हे’ फुड प्रॉडक्ट डॅमेज करू शकतात तुमचे लिव्हर, ‘या’ 10 गोष्टींवर करा कंट्रोल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लिव्हर आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे. कार्बोहायड्रेट स्टोअर करणे आणि प्रोटीन बनवण्यापासून पोषकतत्वांचे अवशोषण करण्यात याची मोठी भूमिका असते. लिव्हर संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यात सुद्धा मदत करते. परंतु खाण्यात काही अशा वस्तू येतात ज्यामुळे आपले लिव्हर हळुहळु डॅमेज होऊ शकते. या वस्तू कोणत्या ते जाणून घेवूयात…

1 साखर –
साखर लिव्हरसाठी घातक आहे. डाएटमध्ये अ‍ॅडेड शुगर, सोडा, पेस्ट्री आणि कँडीसारख्या वस्तूंचा कमीत-कमी समावेश करा.

2 हर्बल सप्लीमेंट –
काही महिला मेनोपॉझमध्ये कावा वनस्पती घेतात, हे लिव्हरचे काम रोखते, यामुळे हेपेटायटिसची समस्या होऊ शकते, लिव्हर फेल होऊ शकते. यामुळे हर्बल सप्लीमेंट घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3 मेडिसिन –
औषधांमध्ये केमिकल्स असतात. काही रसायनांमुळे लिव्हरचे नुकसान होते. यासाठी डाक्टरांचा सल्ला घ्या.

4 खुप जास्त व्हिटॅमिन ए सप्लीमेंट –
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए सप्लीमेंट घेतल्यास लिव्हरवर परिणाम होतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

5 असिटामिनोफेन –
पेन किलर औषधांमध्ये असिटामिनोफेन असते ज्याचा परिणाम लिव्हरवर होतो. अशी औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

6 ट्रान्स फॅट –
पॅकेज्ड आणि बेक्ड फुड ट्रान्स फॅट वाढवतात. लिव्हरसाठी हे चांगले नाही.

7 अल्कोहोल –
दारू सेवनाचा थेट परिणाम लिव्हरवर होतो. ते खराब होऊ शकते.

8 नॉन ऑर्गेनिक फुड –
नॉन ऑर्गेनिक फुड हे केमिकलच्या मदतीने पिकवले जाते. हे शरीरासाठी हानिकारक असते. याचा किडनी, लिव्हरवर वाईट परिणाम होतो.

9 सीलबंद फुड –
पॅकेट बंद खाण्यात जवळपास सर्व पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर होतो, याचा लिव्हरसारख्या अवयवांवर वाईट परिणाम होतो.

10 ओव्हरवेट –
लिव्हर सेल्समध्ये जास्त फॅट जमा झाल्याने नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका वाढतो.