सावधान ! सोशल मीडियाचा जास्त वापर करत असाल तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामध्ये वॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा अनेक प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे त्यात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियाच्या जास्त वापराने मानसिक आजारात भर
रिपोर्टनुसार ज्यांना सोशल मीडियाचा वापर खूप जास्त प्रमाणात करायला आवडतो असे लोक सोशल मीडियाच्या आहारी जातात आणि परिणामतः मानसिक रोगी बनतात. वॉट्सअ‍ॅप फेसबुकचं नाही तर टिकटॉकने देखील अनेकांना मनोरुग्ण बनवलेले आहे. तज्ञांच्या मते जर एखादा व्यक्ती दोन तासापेक्षा अधिक वेळ सोशल मीडियावर घालवत असेल तर त्याला मानसिक आजार होऊ शकतात.

एम्सचे प्रसिद्ध डॉक्टर येतन पाल यांनी सांगितले की लोकांना वेब सिरीज, गेमिंग आणि पैसे कमवून देणारे सोशल मीडिया अ‍ॅप खूप आजारी पाडतात. त्यामुळे लोकांमध्ये विसरण्याचे आजार वाढतात. यामध्ये तरुण मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

सोशल मीडियाचा नेमका काय परिणाम होतो
सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट न मिळाल्यामुळे त्याचा थेट परिणाम लोकांवर होऊ लागला आहे. यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांवर भावनात्मक ओझे सुद्धा वाढते.

 

visit : policenama.com