World Mental Health Day 2021 | ‘चाणाक्ष’ बुद्धी पाहिजे असेल तर सेवन करा ‘या’ 10 गोष्टी, मेमरी लॉस-अल्झायमर राहील दूर; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – World Mental Health Day 2021 | मनुष्याचा मेंदू शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. त्याची ऑर्डर मिळाल्यानंतर शरीराचे इतर अवयव काम करतात. आरोग्यदायी जीवनासाठी ब्रेन फंक्शन निरोगी असणे आवश्यक आहे. याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 10 ऑक्टोबरला ’वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ (World Mental Health Day 2021) साजरा केला जातो. यानिमित्त 10 अशा वस्तूंबाबत जाणून घेवूयात ज्यामुळे मेंदूचे आरोग्य खुप चांगले राहते.

 

 

1. पालक (Spinach) –
पालक सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते, मेमोरी लॉस आणि अल्झायमरसारखे आजार दूर राहतात.

 

2. अक्रोड (Walnut) –
अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. हृदय आणि मेंदूसाठी उपयोगी आहे.

 

3. धान्य (Grain) –
मेंदूचा विकास आणि गती वाढते. मूड, स्मरणशक्ती आणि वर्तणूक चांगली राहते.

 

4. कॉफी (Coffee) –
एकाग्रता वाढते, मर्यादित प्रमाणात याचे सेवन करावे.

 

5. डार्क चॉकलेट (dark chocolate) –
बुद्धी तीक्ष्ण होते, हे ब्रेन बूस्टर आहे. मेंदू निरोगी राहतो.

6. फॅटी फिश (Fatty fish) –
फॅटी फिश सेवन केल्याने अल्झायमरची समस्या होत नाही. आठवड्यातून एक ते दोन वेळा सेवन करा. सालमन, कॉड आणि टूना मासे खा.

 

7. हिरव्या भाज्या (green vegetables) –
मेंदूचे संरक्षण होते. हिरव्या भाज्या खाणे मेंदूसाठी लाभदायक आहे.

 

8. दूध (Milk) –
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दूध प्यावे. ब्रेन परफॉर्मन्स सुधारतो. स्ट्रेस दूर होतो.

 

9. ब्लॅकबेरी (BlackBerry) –
ब्लॅकबेरीच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते. शॉर्ट टर्म मेमरी लॉसची समस्या दूर राहते. मेंदूच्या पेशींचे रक्षण आणि विकास होतो.

 

10. पाणी (Water) –
पाणी मेंदूसाठी खुप आवश्यक आहे. कारण मेंदूचा 85 टक्के भाग पाण्याने तयार झालेला असतो. पाणी कमी झाल्यास मेंदूच्या पेशी आकुंचन पावतात. पाणी भरपूर प्यायल्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. दिवसभरात 6 ते 8 ग्लास पाणी प्या.

 

Web Title :- World Mental Health Day 2021 | world mental health day 2021 10 best foods for brain health may reduce memory loss and alzheimer risk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | कुख्यात गुंडास कोरोना लस देण्यास शिफारस केल्याच्या गुन्ह्यात एकाला जामीन

How To Become Rich | श्रीमंत व्हायचंय का? अवलंबा ‘या’ 10 दमदार पद्धती, बदलून जाईल संपूर्ण जीवन

Income Tax Raid | IT अधिकारी 100 तासांपासून पार्थ पवारांच्या ऑफिसमध्ये तळ ठोकूनच