अबब ! फक्‍त एका ग्रॅमची किंमत 393.75 लाख कोटी रूपये, ‘ही’ जगातील सर्वाधिक ‘महाग’ वस्तू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात अशा अनेक महागड्या वस्तू आहेत, ज्यांची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. या महागड्या वस्तू फक्त विशेष कार्यक्रमात किंवा विशेष जागेंवरच वापरली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या जगभरातील पाच महागड्या वस्तूंबद्दल सांगणार आहोत.

या आहेत पाच महागड्या वस्तू

1) अँटीमॅटर

हे द्रव्य अनेक कणांपासून बनवले जाते. याचा वापर दुसऱ्या ग्रहांवर जाणाऱ्या अंतराळातील विमानांमध्ये इंधनप्रमाणे केला जातो. त्यामुळे हे जगभरातील सर्वात महागडे इंधन आहे. या इंधनाच्या एक ग्रॅमची किंमत हि 393.75 लाख कोटी रूपये आहे.

2) कॅलिफोरनियम

जगातील दुसऱ्या क्रमांकाची महागडी वस्तू असलेल्या कॅलिफोरनियम ची एक ग्रॅमची किंमत हि 170.91 कोटी रुपये आहे. या वस्तूचा वापर न्यूक्लियर रिएक्टर मध्ये केला जातो.

3) हिरा

दागिन्यांच्या रूपात मोठ्या प्रमाणात परिधान केला जाणारा हिरा जगात तिसऱ्या क्रमांकाची महागडी वस्तू असून याच्या एक ग्रॅमची किंमत 34 कोटी 81 लाख रुपये आहे.

 4) ट्रिटियम

हा चौथ्या क्रमांकाचा महागडा पदार्थ आहे. हा घड्याळ, औषधे तसेच रेडिओ थेरपीमध्ये वापरला जाणाऱ्या या पदार्थाच्या 1 ग्रॅमची किंमत हि 18.9 लाख रुपये आहे.

 5) टॅफिट स्टोन

हा जगातील पाचव्या क्रमांकाचा महागडा पदार्थ असून याची किंमत हि प्रति ग्रॅम 12.6 लाख रुपये आहे.