पाकिस्तानसाठी अतिशय वाईट बातमी ! सर्वात ‘खराब’ पासपोर्टच्या यादीत नावाचा ‘समावेश’, जाणून घ्या भारताचा ‘क्रमांक’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पाकिस्तानसाठी वर्ष सुरू होताच एक वाईट बातमी आहे. पाकिस्तान सर्वात खराब पासपोर्टच्या यादीत चौथ्या स्थानावर आले आहे. तर 2020 मध्ये जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्टच्या यादीतील भारताचे स्थान दोन अंकांनी घसरून 84 व्या स्थानावर पोहोचले आहे. भारतीय पासपोर्टधारकांना जगातील 58 देशात व्हिसा न घेता प्रवेश मिळू शकतो. एका नव्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मोस्ट पॉवरफुल पासपोर्टच्या यादीत जपान पहिल्या स्थानावर आहे.

या पाठीमागे दहशतवादाचे मोठे कारण
पाकिस्तान, अफगानिस्तान, इराक आणि सीरियामध्ये दहशतवादी हालचाली होत असतात. ही मुस्लिम राष्ट्र आहेत. अमेरिका, जर्मनी, साउथ कोरिया, जपान, सिंगापुरसारखे देश मुस्लिम राष्ट्रांतील रहिवाशांना वीजा देण्यास संकोच करतात. या देशांमध्ये दहशतवादी हालचाली दिसून येत नाहीत. दहशतवादामुळे सुद्धा या देशांना पासपोर्टची खालची श्रेणी मिळाली आहे.

इन्टरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार हेनले अँड पार्टनर्सने पासपोर्ट इंडेक्स म्हणजेच पारपत्र सूची जारी केली आहे, ज्यामध्ये पासपोर्टधारकास वीजा न घेता किती देशात प्रवेश मिळू शकतो, या आधारांवर देशांची श्रेणी ठरविण्यात आली आहे. वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल पासपोर्टच्या यादीत जपान पहिल्या स्थानावर आहे. तसेच जपानी पासपोर्टधारक 191 देशांत वीजा न घेता जाऊ शकतात.

व्हिसा न घेता प्रवास करू शकतात भारतीय पासपोर्टधारक
भारतीय पासपोर्टधारक भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, मकाऊ, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलँड, केनिया, मॉरिशस, सेशेल्स, झिम्बाब्वे, यूगांडा, इराण तसेच कतार सह 58 देशांत वीजा न घेता प्रवास करू शकतात. मात्र, काही देशांत व्हिसा जा-ऑन-अरायव्हलची गरज भासू शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/