World No Tobacco Day : स्मोकिंग करण्याने 50% वाढतो कोरोना संसर्गाने मृत्यूचा धोका !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – World No Tobacco Day : जे लोक स्मोक करतात, त्यांच्यात कोविड-19 ने गंभीर आजारी होण्याची आणि मृत्यूची जोखीम 50 टक्के वाढते. असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अ‍ॅडनॉम घेबियस यांनी जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, सध्या कोरोना संसर्गाची जोखीम कमी करण्यासाठी स्मोकिंग म्हणजे धूम्रपान सोडले तर हे मोठे काम ठरेल. यामुळे कोविड-19 सह कॅन्सर, हृदयरोग आणि श्वासाशी संबंधीत आजार विकसित होण्याची जोखीम सुद्धा कमी होईल.

त्यांनी म्हटले, आम्ही सर्व देशांना डब्ल्यूएचओमध्ये सहभागी होणे आणि तंबाखूमुक्त वातावरण बनवण्यासाठी आपली भूमिका निभावण्यासाठी आग्रह करत आहोत, जे लोकांना धूम्रपान सोडण्यासाठी आवश्यक माहिती, समर्थन आणि उपकरणांची माहिती देते. जागतिक आरोग्य संघटनेच्या ’तंबाखू सोडण्याची प्रतिबद्धता’ अभियानाने आपल्या स्मोकिंग सोडण्याच्या टूलकिटद्वारे संसाधनांना एक अरबपेक्षा जास्त लोकांसाठी स्वतंत्रप्रकारे उपलब्ध केले आहे.

Video : ‘महाविकास’ सरकारमधील नेत्यांवर भडकले फडणवीस, म्हणाले – ‘ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते’

राज्याचे मिशन ऑक्सिजन स्वावलंब धोरण ! पुणे विभागात होणार प्रतिदिन 200 टन ऑक्सिजन निर्मिती, 16 नवीन प्रकल्पांचा प्रस्ताव

 

स्मोकर्ससाठी अशी वाढते जोखीम
धूम्रपान करने असेही फुफ्फुसांचे नुकसान करणारे आहे. तर, कोरोनो व्हायरससुद्धा फुफ्फुसांना संक्रमित करतो, यासाठी जे लोक स्मोक करतात त्यांच्यासाठी जोखीम वाढते. स्मोक करण्याने शरीरात एक प्रकारचे एंजाईम वाढते जे फुफ्फुसांना संक्रमित करण्यास कोरोनाला मदत करते.

Pune : पुणे शहरात 8 दिवसांत तरुणवर्गातील 74 हजार 691 जणांचे लसीकरण

Pune : थायलंडच्या कंपनीत गुंतवणुक करण्याच्या आमिषाने फसवणूक

 

एंजाईन असे करतात कोविड संसर्गाची मदत
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, एका संशाधनात आढळले की, धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका वाढतो. कारण यामुळे असे एंजाईम वाढतात जे कोरोना व्हायरसला फुफ्फुसांच्या पेशींमध्ये घेऊन जातात. युरोपीय रेस्परटोरी जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, एस-2 नावाचे एक एंजाईम, धूम्रपान करणार्‍या लोकांच्या शरीरात वाढलेल्या मात्रेत असते सोबत त्या लोकांमध्ये सुद्धा, जे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पलमानरी आजाराने ग्रस्त असतात. हे एंजाईम फुफ्फुसांमध्ये जाण्यासाठी व्हायरसला मदत करते, आणि व्हायरस दुसर्‍यांदा अटॅक करतो.

मागच्या वर्षी झाले होते संशोधन
हे संशोधन मागच्या वर्षी करण्यात आले होते, ज्याचा डाटा चीनमधून घेण्यात आला होता. कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेच्या डाटावर आधारित या संशोधनात आढळले होते की, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आणि विशेषकरून धूम्रपान करणार्‍या पुरुषांमध्ये मृत्युदर खुप जास्त होता. या संशोधनासाठी क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पलमानरी आजाराने ग्रस्त 21 रूग्णांचे नमूने घेण्यात आले होते, आणि 21 नमूने त्या लोकांचे ज्यांना सीओपीडी नाही परंतु स्मोक करतात. या संशोधनात आढळले की, सीओपीडीचे रूग्ण आणि धुम्रपान करणारे, दोन्ही लोकांच्या शरीरात एस-2 उच्च स्तरावर होता.

तुम्हाला माहित का ? अमिताभ यांचे २५ टक्केच लिव्हर काम करते, ‘या’ चुकांमुळे होते कमजोर

Pune : सिंहगड परिसरात एका सोसायटीच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू

Scars Removal : चेहर्‍यावरील जखमेच्या खुणांमुळं चिंतीत आहात ?, ‘हे’ घरगुती उपाय करा, जाणून घ्या

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’