‘कोरोना’मुळं प्रत्येक 10 पैकी एका मधुमेह झालेल्या रूग्णाचा आठवडयाच्या आत होतोय मृत्यू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मधुमेह रुग्णांबद्दल युरोपियन असोसिएशनच्या डायबेटॉलॉजी जर्नलमध्ये फ्रेंच संशोधकांनी एक अभ्यास प्रकाशित केला आहे. त्यात म्हटले आहे की, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी सात दिवसात मधुमेह असलेल्या दर दहा कोरोनाच्या रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की, मधुमेह हे एका अंतर्निहित आरोग्याच्या स्थितीचे प्रतिनिधित्व करते, ज्यामुळे लोकांना कोविड-१९ पासून पीडित होण्याचा अधिक धोका वाढतो.

अभ्यासासाठी १० मार्च ते ३१ मार्च या कालावधीतील फ्रान्समधील ५३ रुग्णालयात भरती असलेल्या १,३१७ रूग्णांच्या आरोग्याची स्थिती समाविष्ट केली गेली होती. संशोधनात असे आढळले की, बहुतेक ८९ टक्के लोक टाइप २ मधुमेह ग्रस्त होते, तर ३ टक्के लोकांना टाइप १ मधुमेह होता आणि बाकी रुग्ण इतर आजारांनी ग्रस्त होते. काही मधुमेह रुग्णांना हृदयविकारही होता, ज्यामुळे कोविड-१९ च्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते.

अभ्यासाच्या सात दिवसांपर्यंत, श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरवर २० टक्के इतर लोकांना ठेवले होते. एका आठवड्यात केवळ १८ टक्के लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. बहुतेक रूग्ण पुरुष होते आणि अभ्यासात समाविष्ट असलेल्या सर्व रुग्णांचे सरासरी वय ७० वर्षे होते.

संशोधकांनी निष्कर्ष काढला की, मधुमेह असलेल्या रुग्णांच्या एका आठवड्यात मृत्यूची शक्यता दुप्पट होती. त्यांना असेही आढळले की, ७५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या रूग्णांचा मृत्यू ५५ वर्षापेक्षा कमी वयाच्या रुग्णांच्या तुलनेत १४ पट अधिक होतो. ६५ ते ७४ वयोगटातील रुग्णांच्या मृत्यूची शक्यता ५५ वर्षांखालील रुग्णांपेक्षा तीनपट जास्त असल्याचे संशोधकांनी म्हटले.

स्लिप एपनिया आणि श्वसनक्रियेचा त्रास असणाऱ्या रूग्णांचा एका आठवड्यात मृत्यू होण्याची शक्यता तीनपटीने वाढते. तसेच मधुमेह असलेल्या लठ्ठ रुग्णांच्या मृत्यूची शक्यताही जास्त होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like