‘या’ देशात मिळतंय फक्त 1. 46 रुपये प्रति लिटर पेट्रोल, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल Petrol अन् डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. 4 मेपासून आतापर्यंत 15 वेळा दरवाढ झाली असून या काळात पेट्रोल 3.54 रुपयांनी, तर डिझेल 4.16 रुपयांनी महाग झाले आहे. सध्या देशाच्या बहुतांश भागात एक लिटर पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. मात्र, जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोलचे Petrol दर वेगवेगळे आहेत. जगात असेही देश आहेत की, जिथे पेट्रोल Petrol अन् डिझेलची किंमत भारतापेक्षा कमी अन् काही देशात भारतापेक्षा जास्त किंमत आहे.

 

कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी बँकेत पैसे गुंतवा, आगामी 6 महिन्यात मिळतील 60 टक्क्यांहून जास्त रिटर्न, जाणून घ्या

 

सर्वात स्वस्त पेट्रोल या देशात मिळते
जगात व्हेनेझुएला हा असा देश आहे जिथे सर्वात स्वस्त पेट्रोल Petrol उपलब्ध आहे. याठिकाणी एक लिटर पेट्रोलची किंमत 1.46 रुपये आहे. आर्थिक संकटाला तोंड देणार्‍या व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल इतके स्वस्त आहे, कारण जगात व्हेनेझुएलामध्ये सर्वात जास्त तेलाचा साठा आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळल्यानंतरही येथील सरकार इंधनावर अनुदान देते. तर दुसर्‍या क्रमांकावर इराण आला आहे, येथे पेट्रोलची किंमत 4.24 रुपये आहे, तर अंगोलामध्ये पेट्रोल Petrol 17.88 रुपये आहे. हे तीन देश असे आहेत जिथे पेट्रोलचा दर पाण्यापेक्षा स्वस्त आहे. जर आपण बाजारात एक लिटर पाण्याची बाटली विकत घेतली तर ती 20 रुपयांना मिळते.

 

.

HSC Bord Exam : बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाचं झालं एकमत

सर्वात महाग पेट्रोल या देशात विकले जाते
ग्लोबल पेट्रोल डिझेल प्राइस. कॉम या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, हाँगकाँगमध्ये पेट्रोल प्रति लिटर किंमत 169.21 रुपये आहे. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये 150.29 रुपये, सीरिया- 149.08 रुपये, नेदरलँड- 40.90 रुपये, नॉर्वे- 135.38 रुपये आणि फिनलँडमध्ये 133.90 रुपये आहे. इंग्लंड-116 रुपये, स्वित्झर्लंड- 115 रुपये, जर्मनी- 116 रुपये, जपान- 93.62 रुपये, ऑस्ट्रेलिया- 68.91 रुपये आणि अमेरिकेत 50.13 रुपये आहे. दरम्यान, पेट्रोल सर्वात महाग असलेल्या देशांमध्ये भारत 58 व्या स्थानावर आहे.

HSC Bord Exam : बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाचं झालं एकमत

उत्पादन शुल्क अन् राज्यांचे व्हॅट
भारतात पेट्रोल-डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावले आहेत. पेट्रोलच्या किमतीतील 60 टक्के, तर डिझेलच्या किमतीतील 54 टक्के हिस्सा करात जातो. केंद्राकडून पेट्रोलवर Petrol प्रतिलिटर 32.90 रुपये, तर डिझेलवर 31.80 रुपये उत्पादन शुल्क आकारले जाते. याशिवाय राज्यांकडून दोन्ही इंधनांवर व्हॅट आकारला जातो. व्हॅटचा दर भिन्न असल्यामुळे प्रत्येक राज्यातील दर भिन्न असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर ठरवले जातात.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

 

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

 

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

 

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !