नऊवारी साडीत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करून क्रांतीने साकारला वर्ल्ड रेकॉर्ड

बर्लिन : वृत्तसंस्था

महाराष्ट्राच्या क्रांती साळवी यांनी बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या बर्लिन मॅरेथॉन शर्यतीत पारंपारिक नऊवारी साडी घालून भाग घेतला. नऊवारी साडीमध्ये ४२ किमीचे अंतर पार करून वेगळा विक्रम आपल्या नावे केला. त्यांनी पारंपारिक नऊवारी साडीत धावत गिनिज बूक मध्ये आपले नाव नोंदवले आहे. धुळ्याच्या क्रांतीने ३ तास ५७ मिनिटात संपूर्ण मॅरेथॉन (४२ किमी) पूर्ण केली. महाराष्ट्रातील पारंपरिक प्रकारच्या वेशभूषेची त्यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर क्रीडा जगाला ओळख करून दिली.

[amazon_link asins=’B01N54ZM9W,B076H51BL9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37b72d27-bb41-11e8-a41b-3fa2ca23765c’]

एस अॅथलेटिक्स क्लबच्या क्रांती यांनी महिलांच्या ५० वर्षांखालील गटात हा पराक्रम केला. त्यांनी पहिले पाच किलोमीटरचे अंतर २८ मिनिटांत  पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपला वेग वाढवताना ४२  किमीचे अंतर  ३ तास ५७ मिनिटे ०७ सेंकदात पार केले. वयोगटात स्पर्धकांमध्ये त्या १८२ व्या क्रमांकावर आल्या, तर संपूर्ण स्पर्धकांमध्ये त्यांचा २५३६ वा  क्रमांक आला.

पुणे महापालिकेत विरोधकांची हेल्मेटगिरी

नऊवारी साडीत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्याच धावपटू ठरल्या.विशेष म्हणजे ४७ वय असणाऱ्या क्रांती यांनी वयाच्या  ४२ व्या  वर्षांपासून धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली . यापूर्वी त्यांनी अमेरिकेतील ‘बोस्टन मॅरेथॉन’मध्येही सहभाग घेतला होता.