Coronavirus : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते रशियन वॅक्सीन, आरोग्य मंत्री म्हणाले – ‘ट्रायल संपली’

मॉस्को : रशियातून एक चांगली बातमी आहे. आता रशियन आरोग्य मंत्री यांनी म्हटले आहे की, त्यांच्या विश्वसनीय वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली आहे. ही तिच वॅक्सीन आहे जी गामालेया इन्स्टीट्यूटने बनवली आहे. याशिवाय आणखी दोन कंपन्यांनी क्लिनिकल ट्रायल करण्याची परवानगी मागितली आहे. गामालेया इन्स्टीट्यूटबाबत दावा करण्यात आला आहे की, ही वॅक्सीन 10 ऑगस्ट किंवा त्यापूर्वी बाजारात येऊ शकते.

स्पुतनिक न्यूज डॉट कॉमच्या वृत्तानुसार, रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांनी म्हटले आहे की, गामालेयाच्या वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली आहे. आता शास्त्रज्ञांवर अवलंबून आहे की, वॅक्सीन बाजारात कधी आणायची.

मॉस्कोतील गामालेया इन्स्टीट्यूटचे शास्त्रज्ञ मागील महिन्यात दावा केला होता की, ते ऑगस्टच्या मध्यावर कोरोना व्हायरसच्या पहिल्या वॅक्सीनला परवानगी देतील. म्हणजे पुढील दोन आठवड्यात रशिया वॅक्सीन बाजारात आणेल. रशियन अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी सीएनएन चॅनलला सांगितले की, ते वॅक्सीनच्या मंजूरीसाठी 10 ऑगस्ट किंवा त्यापूर्वीच्या तारखेसाठी काम करत आहेत.

गामालेया इन्स्टीट्यूटच्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की, या वॅक्सीनला सर्वसामान्य नागरिकांच्या उपयोगासाठी 10 ऑगस्टपर्यंत मंजूरी देऊ. परंतु, सर्वप्रथम फ्रंटलाइन हेल्थवर्कर्सला ती जाईल.

रशियाच्या सोव्हरन वेल्थ फंडचे प्रमुख किरिल मित्रीव यांनी म्हटले की, हा ऐतिहासिक क्षण आहे. जसे आम्ही अंतराळात पहिले सॅटेलाइट स्पुटनिक सोडले होते, हा क्षण तसाच आहे. अमेरिकेचे लोक स्पुतनिकबाबत ऐकुन हैराण झाले होते, तसेच या वॅक्सीनच्या लाँचनंतर पुन्हा होणार आहे.

मात्र, रशियाने अजूनपर्यंत वॅक्सीनच्या ट्रायलचा कोणताही डाटा जारी केलेला नाही. यामुळे तिच्या प्रभावाबाबत कोणतेही मत व्यक्त केले जाऊ शकत नाही. काही लोक यावरू टिका देखील करत अहेत. वॅक्सीन बाजारात आणण्यासाठी राजकीय दबाव असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय वॅक्सीनच्या अर्धवट ह्यूमन ट्रायलवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जगभरात अनेक वॅक्सीनची ट्रायल सुरू आहे. काही देशात वॅक्सीनच्या ट्रायलचा तिसरा टप्पा सुरू आहे, रशियन वॅक्सीनला आपला तिसरा टप्पा अजून पूर्ण करायचा आहे. वॅक्सीनच्या डेव्हलपरने 3 ऑगस्टपर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याची योजना बनवली होती.

यानंतर तिसर्‍या टप्प्याचे परिक्षण सुरू करण्यात येणार आहे. रशियन शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, वॅक्सीन लवकर तयार करण्यात आली, कारण ती अगोदरच अन्य आजरांशी लढण्यास सुद्धा सक्षम आहे. हाच विचार अन्य देश आणि कंपन्यांचा आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, रशियन सैनिकांनी ह्यूमन ट्रायल परीक्षणात व्हॉलंटियर्सचे काम केले आहे. उपक्रमाचे संचालक अलेक्झेंडर गिन्सबर्ग यांनीही वॅक्सीन घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.