World Schizophrenia Day 2021 : सिजोफ्रेनिया ज्यामध्ये रूग्णाला होतात विविध प्रकारचे भ्रम, जाणून घ्या – लक्षणं कोणती आहेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जागृतता निर्माण करण्यासाठी जगात 24 मे रोजी वर्ल्ड सिजोफ्रेनिया डे साजरा केला जातो. हा एक गंभीर मानसिक आजार आहे. रूग्ण सतत भ्रमाच्या स्थितीत असतात. महिला, पुरूषांना कोणत्याही वयोगटात हा आजार होतो. अनेक लोक यास स्प्लिट पर्सनॅलिटी समजतात, परंतु हा दुसर्‍या प्रकारचा डिसऑर्डर आहे.

सिजोफ्रेनियाची प्रारंभीची लक्षणे –

या आजाराची लक्षणे सामान्यपणे किशोरावस्था आणि 20 वर्षाच्या वयात दिसतात. मित्र आणि कुटुंबापासून स्वताला वेगळे करणे, मित्र किंवा सोशल ग्रुप बदलत राहणे, एखाद्या गोष्टीवर फोकस न करू शकणे, झोपेची समस्या, चिडचिडेपणा, अभ्यासात समस्या असणे.

सिजोफ्रेनियाचे काही रूग्ण एका काल्पनिक जगात राहतात. प्रत्यक्ष जगापासून दूर यांचे विचार असतात. यामुळे त्यांच्या भावना, वागणे आणि क्षमतामध्ये बदल होतात. ते भावना योग्य प्रकारे व्यक्त करू शकत नाहीत. जीवन त्यांच्यासाठी निरर्थक होऊन जाते. कशावरूनही ते खुप भावनिक होतात.

सिजोफ्रेनियाच्या रूग्णाला अनेकदा अशा गोष्टी दिसतात किंवा जाणवतात ज्या प्रत्यक्षात नसतात परंतु त्यांना तेच खरे वाटते. अनेक प्रकरणात त्यांना चव आणि वासाची तक्रार असते, जी तिथे नसते. सिजोफ्रेनियाच्या रूग्णाला अनेक प्रकारे चुकीचा विश्वास वाटू लागतो, जसे की स्वताला त्रास दिला जात असल्याचा भ्रम किंवा श्रीमंत किंवा ताकदवान झाल्याचा भ्रम. तसेच आपल्यात दैवी शक्ती आहे असेही वाटू शकते. मात्र मानोसोपचार तज्ज्ञांकडे याची मोठी यादीच असते. सिजोफ्रेनियाच्या रूग्णांना वाटते की, लोक त्यास चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सिजोफ्रेनियाची कारणे –

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सिजोफ्रेनिया अनेक कारणांमुळे होऊ शकतो, जसे की, बायोलॉजिकल, जेनेटिक किंवा सामाजिक स्थिती. काही स्टडीत सिजोफ्रेनियाच्या रूग्णांच्या मेंदूत अनेक प्रकारचे असामान्य स्थिती दिसून आली आहे. संशोधक म्हणतात काही प्रकारचे केमिकल्स या प्रकारच्या आजाराला जन्म देतात. फॅमिली हिस्ट्रीवाल्यांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. ड्रग्स, जुना आजार किंवा खुप जास्त तणाव सुद्धा सिजोफ्रेनियाकडे घेऊन जाऊ शकतो.

सिजोफ्रेनियाचा उपचार –

सिजोफ्रेनियाचा कोणताही अचूक उपचार नाही. हा उपचार आयुष्यभर चालू शकतो. आजाराची लक्षणे कमी होऊ शकतात. आजार समजताच मानोसोपचार तज्ज्ञाकडे जावे. या रूग्णांना सामान्यपणे अँटीसायकोटिक औषधे दिली जातात. काहींना तणावातून बाहेर येण्यासाठी खास थेरेपी दिली जाते. काहींना सोशल ट्रेनिंग दिले जाते. काही गंभीर प्रकरणात रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते.