जगातील सर्वात वृद्ध महिलेची ‘कोरोना’वर मात; आता साजरा करणार 117 वा वाढदिवस

पॅरिस : वृत्तसंस्था – जगातील दुसऱ्या सर्वात वृद्ध महिलेला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. पण त्या महिलेने कोरोनावर मात केली. 116 वर्षीय लिसिसे रॅँडन उर्फ सिस्टर एँड्री असे त्यांचे नाव आहे. कोरोनाला न घाबरता त्यावर मात करत आता ती गुरुवारी 117 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

न्यूज एजन्सी एपीनुसार, सिस्टर एँड्री फ्रान्सच्या टूलोन शहरातील केअर होममध्ये राहते. ती अंध आहे. तिला चालताही येत नाही. त्यामुळे ती सध्या व्हिलचेअरचा वापर करते. तिला जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. अवघ्या तीन आठवड्यात तिने कोरोनावर मात केली. त्याबाबत सिस्टर एँड्री म्हणाली, की मला कोरोना झाला होता. कोरोना रिपोर्ट आल्यानंतर मी घाबरले नाही.

होम केअरचे कम्युनिकेश मॅनेजर डेव्हिड टवेला यांनी सांगितले, की कोरोना रिपोर्ट आल्यानंतर सिस्टर एँड्री यांच्याकडे प्रकृतीची विचारपूस करण्यासोबतच त्यांच्या रूटीनमध्ये (जेवण आणि झोपण्याच्या वेळेत) काही बदल झाला की नाही, याची माहिती घेतली.

कोरोनाला घाबरल्या नाहीत सिस्टर एँड्री

डेव्हिड टवेला यांनी सांगितले, की सिस्टर एँड्री यांना कोरोनाची भीती वाटली नाही. पण आम्ही इतरांबाबत चिंतेत होतो. जानेवारी महिन्यात 88 पैकी 81 लोकांना कोरोना झाला होता. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला होता. पण सिस्टर एँड्री यांनी कोरोनावर मात केली.