‘हे’ जगातील सर्वात ‘उंच’ झाड, ‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’ आणि ‘कुतुब मिनार’लाही टाकले ‘मागे’

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – तुम्हाला जगातील सर्वात उंच झाड कोणतं आणि ते कोठे आहे हे माहीत आहे का ? नाही ना. आज आपण या झाडाबद्दल जाणून घेणार आहोत जे खूप उंच आहे आणि ते कोठे आहे. जगातील सर्वात उंच जिवंत झाड रेडवुड नॅशनल पार्क, कॅलिफोर्नियामध्ये आहे. या झाडाची उंची जवळपास 115.52 मीटर आहे. दिल्लीमधील कुतुब मिनारपेक्षाही उंच असणाऱ्या या झाडाची तुलना आणखी कशासोबत कराल तर लक्षात येईल की, अमेरिकन संसद भवन आणि स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपेक्षाही खूप उंच आहे.

ये है दुनिया का सबसे ऊंचा पेड़, कुतुब मीनार भी इसके आगे लगेगा बौना

या झाडाचं नाव आहे हायपर्शन. या झाडाचा शोध 2006 मध्ये लागला होता. जगातील सर्वात उंच झाड असल्याने या झाडाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलं आहे. रेडवुड नॅशनल पार्कमध्ये स्थित हे झाड दूरूनही स्पष्ट दिसतं.

ये है दुनिया का सबसे ऊंचा पेड़, कुतुब मीनार भी इसके आगे लगेगा बौना

झाडे का गरजेची ?

एक झाड वर्षभरात जवळपास 20 किलो धूळ आणि 20 टन कार्बनडायऑक्साईड शोषून घेतं. झाड प्रत्येक वर्षी 700 किलोग्रॅम ऑक्सिजन उत्सर्जित करतं. उन्हाळ्यातही झाडांच्याखालचं तापमान सामान्य तापमानापेक्षा 4 डिग्रीने कमी असतं. याशिवाय एक झाड प्रत्येक वर्षी जवळपास एक लाख वर्ग मीटर दूषित हवा फिल्टर करतं.

ये है दुनिया का सबसे ऊंचा पेड़, कुतुब मीनार भी इसके आगे लगेगा बौना

7 वर्षांपर्यत वाढू शकतं आयुष्य

विस्कॉन्सिन विद्यापीठाद्वारे केलेल्या एका संशोधनातून समोर आले आहे की, ज्या लोकांच्या घराबाहेर झाड असतं त्यांच्यामध्ये मानसिक निराशेच्या तक्रारी कमी असतात. कॅनडाच्या जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्सनुसार, घराच्या आसपास जर 10 झाडे असतील तर तुमचं आयुष्य 7 वर्षाने वाढू शकतं.

ये है दुनिया का सबसे ऊंचा पेड़, कुतुब मीनार भी इसके आगे लगेगा बौना

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’