बदलू शकते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पूर्ण गणित, मोठ्या बदलांच्या तयारीत ICC

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कोविड-19 महामारीने प्रभावित जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान निर्माण करणार्‍या संघांचा निर्णय त्यांनी जेवढ्या मॅचेसमध्ये भाग घेतला आहे, त्यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर करण्याचा विचार करणार आहे. क्रिकेट वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, आयसीसीच्या क्रिकेट समितीने पहिल्या टुर्नामेंटसाठी या पयार्यावर विचार केला आहे; परंतु अंतिम निर्णय या आठवड्यात मुख्य कार्यकारी समिती घेईल.

आयसीसीची वर्षाची अंतिम तिमाही बैठक सोमवारपासून सुरू होईल. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, समितीने महामारीमुळे खेळण्यात न आलेल्या मॅचेसना ड्रॉ मानने आणि गुण वाटण्याच्या पयार्यावरसुद्धा विचार केला, परंतु हे फटाळले आहे. डब्ल्यूटीसीनुसार, प्रमुख रॅकिंगच्या प्रत्येक नऊ टीम दोन वर्षांत सहा सीरीज खेळतात आणि प्रत्येक सीरिजमध्ये कमाल 120 गुण डावावर लागलेले असतात.

पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्डसवर फायनल
प्रमुख दोन टीम पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्डसमध्ये होणार्‍या फायनलमध्ये स्थान निर्माण करतील. नव्या प्रस्तावानुसार जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व चार टेस्ट गमावल्या आणि इंग्लंडविरुद्ध सर्व पाच टेस्ट जिंकल्या, तर त्याचे 480 म्हणजे 66.67 गुण होतील. भारताने जर इंग्लंडच्या विरुद्ध पाच टेस्ट जिंकल्या आणि ऑस्ट्रेलियाशी 1-3 ने पराभूत झाल्यास, तर त्याचे 510 किंवा 70.83 टक्के गुण होतील जे न्यूझीलंडच्या कमाल शक्य टक्क्यांपेक्षा जास्त असतील.

भारताच्या पराभवाने होईल न्यूझीलंडला फायदा
भारताने जर इंग्लंडला 5-0 ने पराभूत केले आणि ऑस्ट्रेलियाकडून 0-2 ने पराभूत झाला, तर त्याचे 500 गुण किंवा 69.44 टक्के गुण होतील. याचा अर्थ हा होतो की, जर न्यूझीलंडने स्वदेशात 240 अंक मिळवले, तर ऑस्ट्रेलियामध्ये दोन ड्रॉसुद्धा भारतासाठी पुरेसे नसतील. इतर संघांमध्ये न्यूझीलंडची टीम सर्वांत फायद्याच्या स्थितीत आहे. जर टीम वेस्टइंडीज आणि पाकिस्तानच्या विरुद्ध स्थानिक सीरिजमध्ये क्लीनस्विप करत असेल, तर तिचे 420 गुण होतील जे 70 टक्के गुण होतात आणि टीम प्रमुख दोनमध्ये स्थान निर्माण करत फायनल खेळेल. भारताला ऑस्ट्रेलियामध्ये चार टेस्ट खेळायच्या आहेत, तर पाच टेस्टसाठी इंग्लंडची यजमानी करायची आहे आणि या दोन सीरिजमूधन डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये स्थान बनवणार्‍या संघांचा निर्णय होईल. भारताने आतापर्यंत चार सीरिज खेळल्या आहेत आणि 360 गुणांसह सर्वांत पुढे आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया (296) आणि इंग्लंड (292) चा नंबर आहे.