ही सुरूवातीची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच शेवटची ? ICC चेयरमननं दिले संकेत

नवी दिल्ली : अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवनियुक्त चेयरमन ग्रेग बार्कले यांनी सोमवारी मान्य केले की, जागतिक टेस्ट चॅम्पियनशिप ते लक्ष्य मिळवू शकली नाही, ज्यासाठी ती बनवण्यात आली होती. कोविड-19 मुळे आलेल्या व्यत्ययाने तिच्यातील कमतरता उघड केल्या.

महामारीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) चा कार्यक्रम अस्ताव्यस्त झाला. आयसीसीने टक्क्यांच्या हिशेबाने गुण देण्याचा निर्णय घेतला कारण 2021 मध्ये लॉर्ड्समध्ये फायनलपूर्वी सर्व नियोजित सीरीज इतक्या कमी वेळातपूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत.

टेस्ट चॅम्पियनशिपने उद्देशासाठी प्रारूपत बदल केला का, यावर त्यांनी व्हर्च्युअल मीडिया कॉन्फ्ररन्सदरम्यान म्हटले की, संक्षिप्त सांगायचे तर मला असे वाटत नाही. कोविड-19 ने बहुतेक चॅम्पियनशिपच्या कमतरतांना उघड केले आहे.

न्यूझीलँडच्या बार्कले यांना वाटते की, सध्याच्या क्रिकेट कॅलेंडरमध्ये खुप समस्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे झाल्या, ज्या आराखड्यात लोकप्रिय बनवण्यासाठी आणण्यात आल्या आणि त्यांच्यानुसार तसे झाले नाही. त्यांनी म्हटले की, आपल्याकडे जे मुद्दे होते, मला वाटते की, यापैकी काही टेस्ट चॅम्पियनशिप आणण्याच्या कारणामुळे झाले, ज्याचा उद्देश टेस्ट क्रिकेटमधील लोकांची आवड परत आणण्याचा होता.

बार्कले म्हणाले, आदर्शवादी दृष्टीकोनातून पहिले तर ते खुप चांगले होते, परंतु व्यवहारिक दृष्टीने मी याच्याशी सहमत नाही. मी सुद्धा कन्फर्म नाही की, तिने ते सर्व मिळवले, ज्यासाठी ती बनवण्यात आली होती. बार्कले यांनी संकेत दिले की, सुरूवातीच्या डब्ल्यूटीसी अंतिम असू शकतात, कारण छोटे सदस्य टेस्ट क्रिकेट चॅम्प्यिनशिप करू शकत नाहीत. माझे व्यक्तीगत विचार आहेत की, कोविड-19 मध्ये आम्ही यामध्ये जे काही करू शकतो, ते गुणांचे वाटप करून करू शकतो आणि बस एवढेच.

ते म्हणाले, परंतु एकदा असे करण्यासाठी आम्हाला चर्चा केली पाहिजे कारण मी कन्फर्म नाही की, डब्ल्यूटीसीने आपला उद्देश प्राप्त केला का, ज्यासाठी तिला चार-पाच वर्षांपूर्वी विचारानंतर बनवण्यात आले होते. मला वाटते की, आम्हाला यास कॅलेंडरच्या हिशेबाने पहायला पाहिजे आणि क्रिकेटर्सना अशा स्थितीत पोहचवू नये, ज्यामध्ये हे स्थिती खराब करेल.

You might also like