World Top Business Family | जाणून घ्या अमेरिकेच्या वॉल्टन कुटुंबाने कशी केली होती ‘गडगंज’ संपत्तीची ‘वाटणी’, तसंच करायचंय रिलायन्सचे मुकेश अंबानी यांना!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  World Top Business Family | जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे लक्ष आता आपली मालमत्ता मुलांमध्ये वाटण्याकडे लागले आहे. यासाठी त्यांनी जगातील टॉप बिझनेस फॅमिलीत (World Top Business Family) झालेल्या वाटणीच्या फार्म्युलाचा अभ्यास करण्यास सुरूवात केली आहे. वॉलमार्टचे संस्थापक कुटुंब वॉल्टन (Walton) यांच्यापासून कोच कुटुंबाच्या (coach family) फार्म्युलावर रिलायन्सचे चेयरमन मुकेश अंबानी (Ambani Family) विचार करत आहेत.

 

ब्लूमबर्ग (Bloomberg) च्या एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांना वॉल्टन कुटुंबाच्या (Walton family) वाटणीचा फार्म्युला सवार्र्त जास्त पसंत आला आहे.
ज्यानुसार मुकेश अंबानी भविष्यात आपल्या संपत्तीची वाटणी करू शकतात.

 

वॉल्टन फॅमिलीने अशी केली होती वाटणी –

 

वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन (Walmart founder Sam Walton) यांनी जिवंत असतानाच 1988 मध्ये डेव्हिड ग्लास (David Glass) यांना कंपनीचे CEO बनवले होते.
त्यापूर्वी तेच कंपनीचे CEO होते. जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाने स्वताला केवळ बोर्डापुरते मर्यादित केले. आणि इतर ऑपरेशन्स प्रोफेशनल्सच्या हवाली केले.

 

वॉलमार्टच्या बोर्डमध्ये सॅम यांचा मुलगा रॉब आणि पुतण्या स्टुअर्टला सुद्धा सहभागी करण्यात आले.
सोबतच त्यांच्या नातीचा पती ग्रेग पेनर यास 2015 मध्ये अरकान्सस येथील कंपनी बेंटोनव्हिल्लेचा चेयरमन बनवले.

 

मात्र, यासाठी या कुटुंबावर टीकासुद्धा झाली होती की, आपल्या प्रभावाचा वापर करत ते शेयरधारकांच्या वर स्वताच सर्व पदे घेत आहेत.
परंतु, या कुटुंबाच्या अनेक इतर सदस्यांना वॉलमार्टपासून वेगळ्या फिलँथ्रॉपी आणि इतर कंपन्यांमध्ये पदे देण्यात आली.

 

सॅम यांनी आपल्या निधनापूर्वी 40 वर्ष अगोदर 1953 मध्येच वारसदारांची तयारी सुरू केली होती.
आणि संपत्तीची वाटणी त्यांची चार मुले एलाईस, रॉब, जिम आणि जॉन यांच्यात करण्यात आली. आजही या कुटुंबाने वॉलमार्टचा 47% भाग आपल्याकडे ठेवला आहे.

 

अशाच प्रकारे रिलायन्समध्ये होऊ शकते विभागणी –

 

मुकेश अंबानी हे सॅम वॉल्टन यांच्याप्रमाणे आपल्या संपत्तीची वाटणी दोन मुले, मुलगी आणि पत्नीमध्ये करू शकतात.
ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांना वॉल्टन कुटुंबाचा फार्म्युला जास्त पसंत आला आहे. (World Top Business Family)

 

असे म्हटले जात आहे की, मुकेश अंबानी आपल्या कुटुंबाची मालमत्ता एका ट्रस्टीप्रमाणे संस्था बनवून चालवण्याची जबाबदारी देण्याच्या योजनेवर काम करत आहेत.
जी रिलायन्स ग्रुपचे सुद्धा व्यवस्थापन करेल. मात्र, अधिकृतपणे याबाबत कुठूनही काहीही सांगण्यात आलेले नाही.

 

असे असू शकते रिलायन्सचे स्वरूप –

 

मीडिया रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची योजना आहे की, नवीन संस्थेत त्यांची आणि पत्नी नीता अंबानी, दोन्ही मुले आणि मुलगीची भागीदारी असावी.
सोबतच यामध्ये कंपनीच्या विश्वासू सल्लागारांचाही समावेश केला जाऊ शकतो.

 

याशिवाय कंपनीचे व्यवस्थापन आणि व्यवहार बाहेरील प्रोफेशनल्सने सांभाळावा. ज्यामध्ये कुटुंबाचा हस्तक्षेप नसावा.
रिलायन्स आज रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकलपासून टेलीकम्युनिकेशन, ई-कॉमर्स आणि ग्रीन एनर्जीपर्यंतच्या उद्योगात काम करत आहे.

 

Web Title : World Top Business Family | america walton family distribution of immense wealth mukesh ambani reliance wants to same lines

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Holiday Calendar | 2022 मध्ये किती सुट्ट्या? शनिवार-रविवारमध्ये बुडणार 12 हॉलिडे

Jalgaon Crime | सगळे गाढ झोपले असताना वडिलांनी घेतला गळफास

Senior Citizen Saving Scheme | बचत योजनांमधून मिळत असेल लाखो रुपयांचे व्याज, तर जाणून घ्या केव्हा आणि कसे वाचू शकता टॅक्स कपातीपासून