दुसर्‍या महायुध्दातील ‘B-17 बॉम्बर’ विमान ‘टेकऑफ’ करताच जमीनीवर कोसळलं, 7 जणांचा मृत्यू

हॅटफोर्ड (अमेरिका) : वृत्तसंस्था – दुसर्‍या महायुद्धात वापरले गेलेल्या  बी -17  या बॉम्बवर्षाव करणाऱ्या विमानाचा अपघात झाला असून  त्यात 7 लोक ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेच्या कनेक्टिकटमधील हॅटफोर्ड विमानतळावर उड्डाण घेण्याच्या प्रयत्नात असताना बुधवारी हे विमान दुर्घटनाग्रस्त  झाले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार  , विमानात 10 प्रवाश्यांव्यतिरिक्त 3 क्रू मेंबर्सदेखील होते. अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असले तरी प्रत्यक्षात  मृतांची संख्या वाढू शकते. अद्याप मृत्युमुखी पडलेल्या लोकांची अधिकृतमाहिती समोर आली नाही. कनेटिकट पब्लिक सेफ्टी कमिश्नर जेम्स रवेला यांनी सांगितले की विमान अपघातानंतर विमानात असलेले काही लोक जळून खाक झाले असून त्यांची ओळख पटवणे फारच अवघड आहे.

उड्डाणानंतर लगेच अपघात –

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,  राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाने या घटनेच्या चौकशीसाठी एक पथक पाठवले आहे.  विमान काही मिनिटांसाठीच हवेमध्ये होते त्यानंतर लगेचच विमानाचे  नियंत्रण सुटले  आणि ते वेगाने खाली आले.  पॉयलटने विमान उंचीवर जात नसल्याची तक्रार केली होती.  हे विमान नागरी विमान उड्डाण सेवेतून  निवृत्त झाले होते, मात्र ते  कूलिंग्स फाऊंडेशन या शैक्षणिक गटाशी संबंधित होते.

फ्लाइट वेअर कडील उड्डाण रेकॉर्ड्सवरून अशी माहिती निदर्शनास आली की  विमान टेकऑफनंतर सुमारे पाच मिनिटांनी लगेच खाली आले. त्याने सुमारे 8 मैल (13 किलोमीटर) प्रवास केला आणि 800 फूट (244 मीटर) उंची गाठली.परंतु थोड्या वेळाने ते उच्च उंचीवर जाण्यात अपयशी ठरले.

 बी -17 बॉम्बर विमान कधी बनले?

बी -17 विमान 1945 मध्ये तयार केले गेले होते. जे दुसऱ्या महायुद्धात  वापरले  गेले . त्याने चाचणी दरम्यान तीन आण्विक स्फोट होण्यापूर्वी बचाव पथक आणि लष्करी हवाई वाहतूक सेवेत काम केले.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या