जगातील सर्वात महाग बिर्याणी, यात आहे 23 कॅरेट सोने, किंमत ऐकून व्हाल हैराण

दुबई : वृत्तसंस्था –  ही आहे जगातील सर्वात महागडी बिर्याणी. यामध्ये खाण्यालायक 23 कॅरेट गोल्ड सुद्धा लावलेले आहे. म्हणजे असे सोने जे तुम्ही खाऊ शकता. या अप्रतिम पदार्थाला जगातील सर्वात महाग बिर्याणीचा किताब दिला जात आहे. या बिर्याणीचे नाव द रॉयल गोल्ड बिर्याणी आहे. ही बिर्याणी कुठे मिळते? तिची किंमती किती आहे? ते जाणून घेवूयात…

द रॉयल गोल्ड बिर्याणी मोठ्या सोन्याच्या ताटात वाढली जाते. तुम्हाला अनेक प्रकारच्या तांदळापैकी तुमच्या पसंतीच्या तांदळाची निवड करता येते, जे तुम्हाला बिर्याणीमध्ये हवे असतात. जसे की, बिर्याणी राईस, खिमा राईस, सफेद किंवा केसरी राईस. याच्या सोबत बेबी पोटॅटो, उकडलेली अंडी, रोस्टेड काजू, डाळिंब, तळलेला कांदा आणि पुदीना दिला जातो.

द रॉयल गोल्ड बिर्याणीचे एकुण वजन 3 किलोग्रॅम असते. केसर टाकलेल्या बिर्याणी राईसवर काश्मीरी भेड शीग कबाब, राजपूत चिकन कबाब, मोघलाई कोफ्ता, मलाई चिकन रोस्ट आणि जुन्या दिल्लीचे लॅम्ब चॉप्स टाकले जातात. याशिवाय, अनेक चटण्या आणि सॉस निवडण्याची संधी असते.

चटण्या आणि सॉसमध्ये निहारी सालन, जोधपुरी सालन, बदामी सॉस, बदाम आणि डाळिंबाचा रायता असतो. जेव्हा ही प्लेट येते त्यानंतर द रॉयल गोल्ड बिर्याणीच्या वर 23 कॅरेट गोल्डचा वर्ख लावला जातो. या सोन्याचा थर तुम्ही खाऊ शकता.

ही बिर्याणी दुबईतील बॉम्बे बॉरो नावाचे रेस्टॉरंट बनवते. तिच्या एका प्लेटची किंमत 1000 डिनर आहे. म्हणजे भारतीय चलनात 19,707 रुपयांच्या जवळपास. जर ही बिर्याणी तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला दुबईला जावे लागेल. तिचा रूचकर स्वाद तुमचा दुबई प्रवास स्मरणीय ठरवू शकतो.