काय सांगता ! होय, 65 वर्षापासून त्याने एकदाही अंघोळ नाही केली, कारण वाचून व्हाल अवाक्

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जगात अशी एक व्यक्ती आहे, ज्याने गेल्या 65 वर्षापासून अंघोळ न करण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याने शरीरावर पाण्याचा एक थेंबसुध्दा टाकलेला नाही. तो इराणचा रहिवाशी असून त्याने असे का केले, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याची माहिती वाचून तुम्हीही चकीत व्हाल.

अमोऊ हाजी (वय 83) असे या माणसाचे नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 65 वर्षापासून त्याला अंघोळ काय असते हे माहित नाही. त्याने आपल्या शरीरावर पाण्याचा एक थेंबसुद्धा पडू दिला नाही. कारण त्याला पाण्याची खूप भीती वाटते. आंघोळ केली तर आपण आजारी पडू असा त्याचा समज आहे. तो कधीही आपली वस्तू स्वच्छ आणि टापटीप ठेवत नाही. कारण स्वच्छ आणि साफ वस्तूंची त्याला खूप चीड येते. त्याच्यामते घाणेरडेपणा त्याला या वयातसुद्धा निरोगी आणि धष्ट, पुष्ट ठेवतो. घाणेरडेपणामुळेच मी इतके आयुष्य जगू शकलो असे तो म्हणतो. अनेकदा अस्वच्छतेच्या कारणांवरून त्याला गावाबाहेर राहावे लागले आहे. विशेष म्हणजे घाणेरडेपणामुळे त्याला कोणतंही इन्फेक्शन होत नाही.

घाणेरडेपणा, अस्वच्छतेचा रेकॉर्ड मोडणा-या अमोऊला मासांहार जास्त आवडतो. त्याला अपघाती किंवा नैसर्गिक पद्धतीने मेलेल्या प्राण्यांचे मास खायला आवडते. याशिवाय खराब झालेल्या भाज्या इतर पदार्थ अमोऊला आवडतात. घरात बनवलेले चविष्ट जेवण अमोऊला आवडत नाही. त्याचा घराचा देखील ठावठिकाणा नाही. गावापासून लांब जमिनीत बनलेल्या खड्ड्यांमध्ये राहायला त्याला आवडते. गावक-यांनी त्याच्यासाठी एक झोपडी बनवली आहे. त्या झोपडीत अमोऊ कधीतरी राहतो. मातीमध्ये राहायला त्याला आवडते.