फायद्याची गोष्ट ! 14 हजार स्वस्तात मिळतोय जगातील 44MP सेल्फी कॅमेऱ्याचा फोन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – ओप्पोचा लेटेस्ट स्मार्टफोन ओप्पो रेनो 3 प्रो वर ऑफर दिली जात आहे. फ्लिपकार्टवरून हा 44 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरावाला फोन स्वस्तात खरेदी करू शकता. ओप्पोने या स्मार्टफोनची 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 29,990 रुपये ठेवली आहे. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 32,990 रुपये ठेवली आहे.

फ्लिपकार्टवर दिलेल्या महितीनुसार हा फोन ऑफरअंतर्गत स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवरील एक्सचेंज ऑफरनुसार फोनवर 14,000 रुपयांचे डिस्काउंट दिले जात आहे. सोबतच यावर नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शनसुद्धा आहे.

जगातील पहिला 44एमपी सेल्फी कॅमेरा हे या स्मार्टफोनचे सर्वात खास फिचर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 44 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा जगातील पहिला 44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरावाला स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 44 मेगापिक्सल सेंसरसह दोन मेगापिक्सलचा डेप्थ सेंसरसुद्धा दिले आहेत.

ओप्पोच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल होल-पंच सेल्फी कॅमेरा सेटअप डिस्प्लेच्या टॉप-लेफ्टमध्ये दिला आहे. ग्राहक हा फोन ऑरोरल ब्लू, मिडनाइट ब्लॅक आणि स्काय वॉइट कलरच्या ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात.

फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलच्या मेन सेन्सरशिवाय 13 मेगापिक्सलचा टेलिफोटो शूटर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम शूटर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अल्ट्रा नाईट सेल्फी मोडसह सादर करण्यात आला आहे, ज्याच्यामदतीने कमी प्रकाशात मल्टिपल शॉट्स घेऊन उत्तम फोटो क्लिक करता येऊ शकतो. पॉवरसाठी फोनमध्ये 4,025 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी 30 वॉटच्या सुपर व्हीओओसी फास्ट चार्ज टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, फोनची बॅटरी 20 मिनिटात 50 टक्के चार्ज होईल.