पहिल्या उडणाऱ्या कारचे लाॅंचपूर्वीच 800 बुकिंग

नवी दिल्ली :
वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या जनतेला आता दिलासा मिळणार आहे.  Samson Sky या कंपनीने चक्क उडती कार तयार केली आहे. तर,  लाॅंच होण्यापुर्वीच तब्बल 800 जणांनी या कारचे बुकिंग केले आहे. त्यामुळे या नव्या प्रकारच्या कारविषयी असलेली लोकप्रियता दिसून येत आहे.
या नव्या उडत्या कारला जगभरातून मागणी असून एकून 24 देशातील ग्राहकांनी ही कार बूक केली आहे. या ग्राहकांपैकी एकट्या अमेरिकेचे 46 ग्राहक आहेत. या कारचे नाव Switchblade आहे. महत्वाचे म्हणजे ही कार हवेतून उडण्यासोबतच रस्त्यांवरुनही धावू शकणार आहे.
[amazon_link asins=’B0778JFC13,B0748NPV86′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4be2036d-b50f-11e8-b47c-4d554c241389′]

समोर आलेल्या माहितीनुसार, या कारचा हवेतील उडण्याचा वेग प्रति तास 305 किमी आहे. या कारमध्ये फक्त दोनच व्यक्ती बसू शकतात. ही कार छोट्या विमानासारखी दिसते. तर, कारला पंखही देण्यात आले आहेत. या कारचा उतरतानाचा वेग प्रती तास 201 किमी आहे. आता ही कार कधी लाॅंच होईल याकडे जगातील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.