भारतात तयार होतोय जगातील सर्वात उंच Railway Bridge, काम जवळपास पूर्ण, रेल्वेमंत्री Piyush Goyal यांनी शेयर केला फोटो

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारून जवळपास तयार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंबंधी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी ब्रिजला इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने अतुलनीय म्हणत त्याचे फोटो सुद्धा शेयर केले आहेत. चिनाब नदीवर तयार होत असलेला हा पूल 476 मीटर लांब आहे. इंद्रधनुष्याच्या आकाराचा हा ब्रिज रेल्वेच्या त्या महत्वकांक्षी प्रोजेक्टचा भाग आहे, जो काश्मीरला उर्वरित भारताशी जोडेल.

इतका आहे खर्च
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, इन्फ्रास्ट्रक्चर मार्बल इन मेकिंग. भारतीय रेल्वे आणखी एक इंजिनियरिंगमधील मैलाचा दगड प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज असेल. 1250 कोटी रुपयांच्या खर्चाचा हा ब्रिज चिनाब नदीच्या तळापासून 359 मीटर वर आणि पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच होईल.

 

 

भूकंपाचा होणार नाही परिणाम
हा आगळावेगळा ब्रिज रिश्टर स्केलवर 8 तीव्रतेचा भूकंप आणि अति तीव्रतेच्या स्फोटाचा सुद्धा सामना करेल. रेल्वे अधिकार्‍यांनुसार, यामध्ये संभाव्य दशहतवादी धोके आणि भूकंपाबाबत सुरक्षा प्रणाली सुद्धा असेल. ब्रिजची एकुण लांबी 1315 मीटर असेल. या ब्रिजसाठी काम नोव्हेंबर 2017 मध्ये सुरू झाले होते. हा प्रोजेक्ट कोकण रेल्वेद्वारे विकसित केला जात आहे आणि हा भारतातील पहिला केबल-स्टे इंडियन रेल्वे ब्रिज आहे.

100 च्या वेगाने धावेल ट्रेन
चिनाब नदीवर तयार होत असलेला हा ब्रिज ऊधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल्वे प्रकल्पाचा भाग आहे, जो मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल. या ब्रिजच्या मुख्य कमानीचा व्यास 485 मीटर आहे. ब्रिजमध्ये एकुण 17 खांब लावलेले आहेत आणि सर्वात उंच खांबाची उंची 133.7 मीटर आहे. ब्रिजच्या निर्मितीसाठी एकुण 25 हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर झाला आहे. ब्रिजवर 100 किमी प्रतितास वेगाने ट्रेन धावू शकते.