‘ही’ आहे जगातील सर्वात HOT आजी, पार्कमध्ये नातवंडासोबत खेळत असताना मागे लागतात अनेक तरुण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Gina Stewart ला जगातील सर्वात हॉट आजीचा टॅग मिळाला आहे. जिनाने मोठ्या कालावधीपर्यंत मॉडेलिंगच्या जगतात आपला दबदबा ठेवला होता. जिनाचा फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. ती नातवंडांची आजी आहे परंतु तिला पाहून विश्वास बसत नाही की तिचे वय 50 पेक्षा जास्त आहे. आता जिनाने वयाच्या तुलनेत तरुण दिसणार्‍या तिच्या चेहर्‍याचे रहस्य उघड केले आहे.

1 ग्लास रेड वाईन आहे रहस्य
जिनाच्या वयाचा अंदाज घेणे खुप अवघड आहे. असे तर तिचे वय पन्नासच्या पुढे आहे, सोबतच ती आपले अनेक हॉट फोटो सुद्धा इंस्टाग्रामवर शेयर करत असते. लोक तिला तिच्या थांबलेल्या वयाचे रहस्य सुद्धा विचारतात. आपल्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने तिच्या वयाचे रहस्य सांगितले आहे. जिनाचे म्हणणे आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य रेड वाईन आहे. ती दररोज एक ग्लस रेड वाईन पिते. याच कारणामुळे तिची त्वचा इतकी ग्लो करते.

डाएटने कंट्रोल केले वय
जिनाने सांगितले की, ती मेडिटेरियन डाएट फॉलो करते. या डाएटने मनुष्याचे आयुष्य वाढते. जिना म्हणते, रेड वाईन मध्ये पॉलिफेनॉल्स असतात, यामुळे हृदयाचे आजार होत नाहीत आणि वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते. अशी वाईन निवडा जिच्यामध्ये रेस्वेराट्रोल असेल. यामुळे आयुष्य वाढते.

जगभरात लाखो चाहते
जिनाचे लाखो इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत. पण तिचे चाहते तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाहीत. अनेक चाहते तिच्या सौंदर्यावर नेहमीच कमेंट करतात. सोबतच लिहितात की, जिना तिच्या वयाच्या निम्मी दिसते. प्रत्येकजण तिच्याकडून ब्यूटी टिप्स मागतो. जिनाचे म्हणणे आहे की, मानसिक शांतता सुद्धा वयाला नियंत्रित करण्यात खुप मदत करते.