10 हजार खोल्याांचे आहे ‘लक्झरी हॉटेल’: यातील 5 मजले वापरणार ‘या’ देशाचे राजघराणे

पोलिसनामा ऑनलाईन – जगात एकापेक्षा एक प्रशस्त आणि आलिशान हॉटेल आहेत. ज्यांची वैशिष्ट्ये लोकांना आश्चर्यचकित करीत असतात. असेच एक हॉटेल सौदी अरेबियाच्या पवित्र शहर मक्का येथे बांधले जात आहे. हे हॉटेल बांधल्यानंतर जगातील सर्वात मोठे हॉटेल म्हणून ओळखले जाईल.

सर्वात मोठ्या हॉटेल्समध्ये ग्राहक अर्थात अतिथींसाठी राहण्यासाठी 500 किंवा 1000 खोल्या उपलब्ध असतात, परंतु या हॉटेलमध्ये एकूण 10,000 खोल्या उपलब्ध असणार आहेत. हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल असेल. 12 टॉवर्स असलेल्या या आलिशान हॉटेलमध्ये एकूण 70 रेस्टॉरंट्स असणार आहेत. जे दिवस रात्रं खुले असणार आहेत. म्हणजे ग्राहक अर्थात पाहुण्यांना त्यांच्या आवडीचे रेस्टॉरंट निवडण्याची संधी मिळणार आहे. आजवर कोणत्याही हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने रेस्टॉरंट उघडले गेले नाही.

या हॉटेलचे नाव ’अबराज कुदाई’ असे आहे. या हॉटेलचे एक वैशिष्ट्य म्हणजे इमारतींच्या वरच्या बाजूला चार हेलिपॅडही बनविण्यात आले आहे. जेणेकरुन हेलिकॉप्टरच्या प्रवाशांना त्रास होणार नाही. येथील सर्वात उंच टॉवर 45 मजल्यांचा असेल तर सर्वात उंच टॉवर 30 मजल्यांचा असेल.

या हॉटेलची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याचे पाच मजले केवळ सौदी अरेबियाच्या राजघराण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत. जेथे सामान्य लोक परवानगीशिवाय जाऊ शकणार नाहीत. असे मानले जाते की, या हॉटेलच्या बांधकामासाठी 233 अब्ज रुपये खर्च येणार आहे. हे दार अल-हंदासाह ग्रुपने डिझाइन केले आहे. ही आंतरराष्ट्रीय प्रकल्प डिझाइन फर्म आहे.

यापूर्वी असे सांगितले गेले होते की, हे हॉटेल 2017 मध्ये तयार होईल, परंतु काही आर्थिक अडचणींमुळे त्याचे बांधकाम थांबविण्यात आले आहे. त्यानंतर जेव्हा त्याचे बांधकाम पुन्हा सुरू झाले, तेव्हा असे म्हटले गेले की, ते 2019 किंवा 2020 मध्ये तयार होईल, परंतु तसे झाले नाही आणि त्यानंतर 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे काम थांबले आहे. आता याला किती काळ लागेल, हे सांगता येईना.